लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : ग्रामीण कुस्तीपटुंनी कठोर परिश्रमाने यश संपादन करावे. राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घ्यावी, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले आहे.ग्रामीण क्षेत्रातील युवक, युवतीच्या क्रीडा कौशल्यास वाव मिळावा, विविध क्रीडा प्रकारात त्यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या भावनेतून साखरी (वा) येथील संघर्ष युवा विकास मंडळाच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.ग्रामीण क्षेत्रात क्रीडापटू घडविणे हे ध्येय या संस्थेचे असले तरी संस्थेने सामाजिक क्षेत्रातसुद्धा भरीव योगदान दिले आहे. दिव्यांग दिलीप मधुकर झुंगरे याना उदरनिर्वाहासाठी प्रतिमाह एक हजार रुपय देण्याचे मंडळाचे सचिव अॅड. प्रशांत घरोटे यांचे कार्य समाजाला प्रेरणा देणार असल्याचे गौरवोद्गारही अहीर यांनी यावेळी काढले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा नेते खुशाल बोंडे तर प्रमुख अतिथी म्हणून वाघुजी गेडाम, राहूल सराफ, अरुण मस्की, सतीश दांडगे, राजू घरोटे, शेख जुम्मन रिझवी, साखरीचे सरपंच भाऊजी कोडापे, पं. स. सदस्य संजय करमनकर व ग्रा. पं. सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा कुस्तीगीत संघाचे पदाधिकारी शरद टेकुलवार, छगन पडगीलवार, मुर्लीधर टेकुलवार, बाळू काटकर उपस्थित होते. स्पर्धेत चंद्रपूर, बल्लारपूर, जिवती, भद्रावती येथील पुरुष-महिला गटातील ७० खेळाडूंनी सहभाग घेतला. पुरुष गटात प्रफुल्ल चौधरी प्रथम, अश्विन खनके द्वितीय विजयाचे मानकरी ठरले. महिला गटात साक्षी नचीपल्लीवार, तर द्वितीय माधुरी झाडे विजयी झाल्या. स्पर्धेसाठी मिथून काटवले, अमोल घटे, ललीता मडावी, शकुंतला आत्राम, सतीश आत्राम यांनी सहकार्य केले.
ग्रामीण कुस्तीपटूंनी राष्ट्रीय झेप घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2019 10:35 PM
ग्रामीण कुस्तीपटुंनी कठोर परिश्रमाने यश संपादन करावे. राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घ्यावी, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले आहे.
ठळक मुद्देहंसराज अहीर : साखरी येथे क्रीडा स्पर्धा