बॉक्स
परराज्यातील सर्व बसफेऱ्या फुल्ल
चंद्रपूर आगारातून राजुरा व कोरपनामार्गे तेलंगणा, आंध्रप्रदेश, हैदराबाद, आसिफाबाद मार्गावर बस धावत होत्या. मात्र, कोरोनामुळे या फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. आता कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने परराज्यात धावणाऱ्या सर्वच बसफेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत. त्याला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सर्वच गाड्या फुल्ल भरुन धावत असल्याचे पाहायला मिळत आहे.
बॉक्स
परराज्यात जाणाऱ्या बसेस
चंद्रपूर - आसिफाबाद
चंद्रपूर - हैदराबाद
चंद्रपूर - आदिलाबाद
राजुरा - कागजनगर
चंद्रपूर - तेलंगणा
बॉक्स
९० टक्के चालकांचे लसीकरण पूर्ण
चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, वरोरा, राजुरा, चिमूर असे चार आगार आहेत. या चारही आगारांमध्ये राज्य परिवहन महामंडळातर्फे कोरोना लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली तसेच विशेष शिबिरही राबविण्यात आले होते. त्यामुळे ९० टक्क्यांच्या वर चालकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
बॉक्स
बस केल्या जातात सॅनिटाईज
कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा होऊ नये, म्हणून बाहेरुन बस आल्यानंतर ती सॅनिटाईज करण्यात येते. तसेच बसमध्ये प्रवाशांना मास्क घालण्याच्या सूचना दिल्या जातात. त्यातच बहुतांश चालक-वाहकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. अशाप्रकारे सुरक्षितता बाळगत लालपरी धावत आहे.