राजकुमार चुनारकर
चिमूर (चंद्रपूर) - आम्ही मानवाच्या जंगलात वास्तव्य करतो. त्यामुळे आम्हाला जंगल, निसर्ग व त्यामध्ये राहणाऱ्या पशू, पक्षी व इतरही सौंदर्य हे दुर्मिळ झाले आहे. मात्र ताडोबातील अंतर्गत सौंदर्य व येथील रुबाबदार वाघ पाहून भारावलो. त्यामुळेच माझा ताडोबातील मुक्काम वाढला. येत्या काही दिवसात मी पुन्हा येणार, अशी प्रतिक्रिया सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी दोन दिवसांच्या ताडोबा भ्रमंतीनंतर रविवारी रिसोर्टमधून जाताना लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
आपल्या वेगवेगळ्या क्रिकेट खेळीने पूर्ण क्रिकेट जगताचा वाघ म्हणून ओळख निर्माण करणारे तथा क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकर परिवारासह वाघ्र प्रेमापोटी चिमूर तालुक्यातील रिसॉर्टमध्ये शुक्रवारपासून मुक्कामी होते. रविवारी प्रजासत्ताक दिनी दुपारी १.३० वाजता सचिन तेंडुलकर आपल्या परिवारासह चेक आऊट करून मुंबईसाठी निघाले. यावेळी रिसॉर्ट आवारात चाहत्यांनी चांगलीच गर्दी केली होती.
शनिवारी सकाळ व दुपारच्या सफारीत सचिन यांना ताडोबा जंगलातील वाघाने दर्शन दिले. सचिन तेंडुलकर खासदार क्रीडा महोत्सवानिमित्त नागपुरात आले असता शुक्रवारी ते ताडोबा येथे आले होते. लोकमत प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी ताडोबा वाघासाठी प्रसिद्ध तर आहेच, याशिवाय येथील निसर्गसौंदर्यही अप्रतिम असल्याचे सांगितले. ताडोबातील रुबाबदार वाघ पाहून आपण भारावलो आहे. येत्या काही दिवसात कुटुंबासोबत पुन्हा वाघ्र दर्शनासाठी आपण ताडोबाला येऊ, असेही सचिन तेंडुलकर म्हणाले.
रिसोर्ट परिसरात चाहत्यांची गर्दी
रविवारी सकाळी ताडोबातील सफारीनंतर चिमूर जवळील रिसोर्टमध्ये सचिन मुक्कामी असल्याने त्याला बघण्यासाठी दुपारी सचिनच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. सचिन बाहेर येताच काही बोलेल,अशी अपेक्षा सर्वांची होती. मात्र तेंडूलकर फारशे बोलले नाही.
आमदार भांगडिया यांनी घेतली सचिनची भेट
ताडोबा सफारीवर असलेले सचिन तेंडुलकर हे परिवारासह दोन दिवसांपासून एका रिसोर्टमध्ये मुक्कामी होते. याची माहिती मिळताच चिमूरचे आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांनी सदर रिसोर्टमध्ये जाऊन भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची भेट घेऊन चर्चा केली.
महत्त्वाच्या बातम्या
मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका, तो मान बाळासाहेबांचा; राज ठाकरेंची पदाधिकाऱ्यांना सूचना
''खोलीत दोन हाणा, पण बाहेर साहेब म्हणा ही शिवसेनेची जुनी सवय''
Today's Fuel Price : सर्वसामान्यांना दिलासा! सलग पंधरा दिवस इंधन दरात घट; जाणून घ्या नवे दर
Corona Virus: चीननं घेतला कोरोना व्हायरसचा धसका; हस्तांदोलन करण्यावरही घातली बंदी