वरोरा : चंदईनाला प्रकल्पग्रस्तांनी १० आॅगस्टपासून प्रकल्पाला कुलूप ठोकून साखळी उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाचा आज ३२ वा दिवस असून सोमवारी उपोषणकर्त्या महिलेला विंचू चावल्याने तिला असह्य वेदना सुरु झाल्या. त्या महिलेला तत्काळ रुग्णालयात दाखल केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र गत एक महिन्यापासून साखळी उपोषणाला बसलेल्या या उपोषणकर्त्यांच्या वेदना अजूनपर्यंत लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचल्या नसेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.उपोषणकर्ते दिवसभर उपाशी राहून शासनाचा निषेध करत असताना मात्र केंद्रीय मंत्री याच परिसरातील शेगाव येथे कार्यक्रमाला येऊनही उपोषण मंडपाला भेट दिली नाही. त्यामुळे उपोषणकर्त्यांत रोष पसरला आहे. निमढेला ग्रामवासी १० आॅगस्टपासून कुटुंबासह साखळी उपोषणाला बसले असून आज उपोषणाचा ३२ वा दिवस आहे. ११ आक्टोबरला दुपारी १२ वाजताच्या सुमारास उपोषणकर्ती लिलाबाई बबन घरत (४५) या महिलेला विंचवाने डंक मारल्याने त्यांना असहाय्य वेदना सुरु झाल्या.घडलेला हा प्रकार पाहून साफ चावला की काय, असे म्हणत सर्वांनी आरडाओरड सुरु केली. पण तेवड्यात तिच्या जवळून विंचू गेल्याने थोडा धीर आला. उपस्थितांनी तिला उपचाराकरिता बोथली येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल केले. आज मंगलवारी दुसºया महिलेची प्रकृती बिघडल्याने तिलाही उपचाराकरिता वरोरा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सदर उपोषणाला ३२ दिवस उलटूनही कोणत्याही लोकप्रतिनिधीने त्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तामध्ये रोष व्यक्त होत आहे.
उपोषणकर्त्या प्रकल्पग्रस्तांची सुरक्षा वाºयावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:03 AM
चंदईनाला प्रकल्पग्रस्तांनी १० आॅगस्टपासून प्रकल्पाला कुलूप ठोकून साखळी उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाचा आज ३२ वा दिवस असून सोमवारी उपोषणकर्त्या महिलेला विंचू चावल्याने तिला असह्य वेदना सुरु झाल्या.
ठळक मुद्देमहिलांची प्रकृती बिघडली : साखळी उपोषणाचा ३२ वा दिवस