शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
5
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
6
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
7
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
8
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
9
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
10
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
11
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
12
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
13
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
14
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
15
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
16
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
17
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
18
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
19
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
20
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 

दु:ख पचवून शेतकºयांची सर्जा-राजाला सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 10:34 PM

शेतकºयांसाठी सर्वात मोठा सण म्हणून पोळा सणाला महत्त्व आहे.

ठळक मुद्देझडत्या ठरल्या आकर्षण : नैराश्येवर उत्साहाची मात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकºयांसाठी सर्वात मोठा सण म्हणून पोळा सणाला महत्त्व आहे. वर्षभर शेतात राबराब राबणाºया ढवळ्या पवळ्याचे पूजन करून त्याने केलेल्या कष्टाची परतफेड शेतकरी यानिमित्ताने करतो. सध्या शेतकºयांची अवस्था बिकट असली तरी दु:ख मनातच पचवून आपल्या बैलाचा सन्मान अबाधित ठेवल्याचे चित्र सोमवारी पोळ्यानिमित्त गावागावात दिसून आले. नैराश्येवर उत्साहाची मात होऊन पोळा सर्वत्र साजरा करण्यात आला.सोमवारी पहाटेच शेताकडे बैलजोड्या चरण्यासाठी गडी माणसे घेऊन गेली. आदल्या दिवशी जेवणाचे आमंत्रण दिलेल्या बैलांना दुपारपर्यंत खाऊ घालून आंघोळ घालण्यात आली. कुठे नदीवर, कुठे नाल्यावर तर काही गावांमध्ये घरच्या बोअरवेलच्या पाण्याने सर्जाराजाला आंघोळ घालण्यात आली. आणि सायंकाळी शेंगावर बेगळं, पाळीवर वेगवेगळी चित्र काढलेल्या झुली, पायात व गळ्यात घुंगराच्या माळा, कवढमा, फुगे, वादी, ओंदा आदी सजावटीचे साहित्य चढवून गावातील हनुमान मंदिराच्या पायथ्याशी तर काही ठिकाणी मोक्क्या मैदानावर जोड्या शेतकºयांनी उभ्या करून परंपरागत पोळा सणाची परंपरा आनंदात आजही साजरी केली.काही गावामध्ये दरवर्षीपेक्षा बैलजोड्यांची संख्या घटल्याचेही दिसले. शेती परवडत नसल्याने ठेका पद्धतीने शेती देऊन शेतकरी मोकळे झाले. काहींनी बैलजोड्याही विकून टाकल्या. त्यामुळे याचाही परिणाम पोळा सणात काहीअंशी दिसून आला. गावात पाटलाच्या किंवा सरपंचांच्या बैलजोडीने तोरण तोडण्याची परंपरा आहे. ही परंपरा काही गावात दिसली तर काही गावात यावरून राजकारणही पुढे आले. मात्र पोलीस प्रशासनाच्या सक्रियतेने पोळा सण जिल्ह्यात आनंदाने पार पडला. या सणाच्या निमित्ताने शेतकरी चिचवणी, वरण, भात, पोळ्या व भाज्यांची मिश्रित वडी तयार करून शेतावर राबणाºया गडी माणसाला जेवणाचे निमंत्रण देतो. सोबतच कुटुंबीय व शेजाºयांना जेवणासाठी बोलावले जाते. ही परंपरा यानिमित्ताने आजही गावात कायम दिसली. शेतकरी कुटुंबात नविन कपडे शेतकरी खरेदी करतो तर महिला शेतकरी आपल्या पारंपारिक वेषात बैलजोडीचे घरी आल्यानंतर पूजन करते. आज सोमवारीही आरती ओवाळून बैलजोडीला नमन करण्यात आले.बाजारही सजलेआधी पोळा सणाची तयारी शेतकरी एक महिनाआधीपासून करायचा. खास म्हणजे पोळा सणात बैलाच्या शिंगांना लावण्यासाठी बिकोटमा व चौरंग तयार केली जायची. मात्र आता बैलाचे सडे, तोरण, चौरंग, घुंगरूमाळ सगळे सजावट साहित्य रेडिमेड मिळते. त्यामुळे शेतकरी पैसे देवून साहित्य खरेदी करतात. हेच चित्र पोळा सणात बघावयास मिळाले.दारूबंदीमुळे पोळा शांततेतजिल्ह्यात सर्वत्र दारूबंदी आणि पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त असल्याने याचा परिणाम पोळा सणात दिसून आला. मद्य पिवून गोंधळ घालणाºयांची संख्या कमी प्रमाणात होती. तर झगडे-भांडण गावांमध्ये दिसून आले नाही. सर्वत्र शांततेत पोळा पार पडला.पाटाळ्यात अभिनव पोळाभद्रावती : तालुक्यातील पाटाळा या गावात अभिनव पोळा साजरा करण्यात आला. यात संपूर्ण गावकºयांनी सहभाग घेतला व वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये स्वामीनाथन आयोग व शेतकºयांना सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी यावेळी लावून धरण्यात आली. यावेळी संपूर्ण गावकºयांनी दिंडीच्या माध्यमातून गावामध्ये फिरून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीबद्दल जनजागृती केली व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी फलकाचे अनावरण केल. पोळा या शेतकºयांचा सण असून या सणाच्या दिवशी शेतकºयांनी केलेली मागणी ही अवश्य सरकारपर्यंत जाणार असल्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.