पळसगाव (पिपर्डा) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संक्रमणात वाढ झाली आहे. गावशिवारात रुग्णांची संख्या वाढली होती. पळसगाव येथील रुग्णांचा त्यात मृत्यू झाला होता. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. कोरोना कायमचा हद्दपार व्हावा, यासाठी पळसगाव येथील महिला व पुरुषांनी ग्रामदेवता मातामायचे पूजन करून साकडे घातले आहे.
देवीच्या मंदिरात दर मंगळवारी वाती, पाणी टाकणे, पूजा करण्यात ग्रामस्थ पुढे आहे. दर मंगळवारी गावातील सर्व धर्मातील मंदिरांमध्ये पूजा व भजन सुरू आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात नतमस्तक होऊन मानवी कल्याणाकरिता ही धडपड सुरू आहे. संकटप्रसंगी मातामायची आराधना केल्यास संकट दूर झाल्याचे गावातील ज्येष्ठ नागरिकांचे मत आहे. कोरोनाने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गाव परिसरात काहींनी कोरोनावर यशस्वी मात केली, तर काहींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोनाला हद्दपार करण्याकरिता गावातील पुढारी यांनी मातामायकडे साकडे घालण्याचा निर्णय घेतला. महिलांकडून सकाळ-संध्याकाळ मंदिरात पूजा केली जाते. गावासोबत देशातूनही कोरोना हद्दपार व्हावा, मानवी जीवन सुखी -समाधानी व्हावे, ही भाबडी आशा ग्रामस्थांची आहे.
===Photopath===
080621\img20210608091834.jpg
===Caption===
मातामाय चे पूजन करताना गावातील महिला पुरुष