शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

दारूबंदीसाठी व्यसनमुक्त मंचचे राज्यपालांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 4:18 AM

व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचच्या शिष्टमंडळाने राज्यपाल यांच्याशी दि. २७ मे रोजी महाराष्ट्र राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाद्वारे चंद्रपूर जिल्ह्याची ...

व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचच्या शिष्टमंडळाने राज्यपाल यांच्याशी दि. २७ मे रोजी महाराष्ट्र राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयाद्वारे चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठविण्यात आली आहे. या जिल्ह्यात मागील सरासरी सहा वर्षांपासून दारूबंदी होती. यासाठी नागरिक व महिलांकडून मोठ्या संख्येने दीर्घकालीन लढा देण्यात आला होता. लाखो महिलांनी रस्त्यावर उतरून दारूबंदीची मागणी केली होती. याची दखल घेऊन तत्कालीन युती सरकारने दारूबंदी लागू केली होती.

मात्र चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हटविण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या राज्यमंत्रिमंडळाने घेतला आहे. भारतीय राज्यघटनेतील तत्त्वांच्या खुले आम विरोधात जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्याचे आश्वासन देत निवडणूक लढवली होती, असा आरोप या मंचने केला आहे.

कोरोना महामारीमुळे सामान्य जनता, विशेषतः महिलावर्ग, मागास जाती-जमाती अभावग्रस्त, हवालदिल आहेत. शासकीय बंधनांमुळे विरोध व्यक्त करण्यासाठी एकत्र येणेसुद्धा अशक्य आहे. अशा कोंडीत सापडलेल्या गोरगरिबांचे जिणे आणखी अवघड करणारा हा निर्णय लादला गेला आहे. तसेच चंद्रपूर जिल्हा दारूबंदी हटविताना संतापजनक व खेदजनक कारणे दाखवली गेली, असे या मंचचे म्हणणे आहे. याबाबत व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचच्या शिष्टमंडळाने राज्यपाल यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

दरम्यान, मंचच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस करत ते स्वत: दारूबंदी, व्यसनमुक्तीच्या बाजूने असल्याचे सांगितले. महाराष्ट्र शासनाला चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याबाबतचे पत्र देणार, राज्याचे व्यसनमुक्ती धोरण २०११च्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा तयार करण्‍याचे तसेच व्यसनमुक्ती प्रचार- प्रसारबंदी- उपचार यासाठी काम करणाऱ्यांना शासनाने पाठिंबा व मदत करण्याविषयीचे आश्‍वासन दिले. मंचतर्फे मागणी करण्‍यात आलेल्या रमानाथ झा समितीचा अहवाल जनतेसाठी खुला करून देण्‍याबाबतचे आश्‍वासन यावेळी दिले. यावेळी मंचचे राज्य निमंत्रक अविनाश पाटील, राज्य निमंत्रक वर्षा विद्या विलास, सामाजिक कार्यकर्त्या वसुधाताई सरदार, ॲड. रंजना गवांदे, मार्गदर्शक वैकुंठ आत्मानुसंधान अड्याळ टेकडी (ब्रह्मपुरी)चे संचालक सुबोधदादा उपस्थित होते.