शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

शेतकऱ्यांकडून शासन अनुदानित बैलांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 11:30 PM

राजुरा तालुक्यातील लक्कडकोट व कवीठपेठ येथील बैल खरेदीदाराने गावोगावी एजंट नेमून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील बैलांची खरेदी सुरू केली आहे.

ठळक मुद्देआर्थिक संकट : संधीचा फायदा घेत आहेत दलाल

आॅनलाईन लोकमतराजुरा : राजुरा तालुक्यातील लक्कडकोट व कवीठपेठ येथील बैल खरेदीदाराने गावोगावी एजंट नेमून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील बैलांची खरेदी सुरू केली आहे. सध्या नापिकी, कर्ज व वन्यप्राण्यांचा हैदोस, यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकरीही अनुदानित बैलांची विक्री करीत आहे. याच संधीचा लाभ घेत एजंटांकडून पडत्या दरात बैलांची खरेदी केली जात आहे.या बैलांची वाहतूक बगलवाही (कोस्टाळा) या आडमार्गाने तेलंगणा राज्यातील गणेशपूर बैल बाजारात केली जाते. शासनाकडून मिळालेल्या अनुदानित बैलाची खरेदी करून नेले जात असताना प्रस्तुत प्रतिनिधीस आढळून आले.शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन कर्जात अडकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची घोषणा केली. यात विविध अटी व शर्ती लादल्यामुळे त्याची शहनिशा व तपासणी करण्यात बराच कालावधी गेला. त्यामुळे शेतकºयांना वेळेवर कर्ज मिळू शकले नाही. नुकतीच प्रथम कर्जमाफीची यादी जाहीर करण्यात आली. त्यात मोठ्या प्रमाणात तफावत व दोष आढळल्यामुळे शेतकरी लाभापासून वंचित आहे.यंदा अल्पशा पावसाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन पेरणी केली. त्यास निसर्गाने साथ दिली नाही. पिकावर विविध प्रकारचे रोग, जमिनीचा ओलावा नष्ट होणे, कमी भाव, उत्पादनात घट, वन्यप्राण्यांचा हैदोस, बँक व खासगी कर्जाचा बोझा यात शेतकरी पिसला जात आहे.यातून मार्ग काढण्यासाठी काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. याच संधीचा लाभ घेण्यासाठी बैल खरेदीदारांनी मोठ्या प्रमाणात चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यातील बैलाची पडत्या दरात खरेदी सुरू केली आहे. रविवारी अशाच प्रकारे काही बैलांची खरेदी करून नक्षलग्रस्त बगलवाही (कोष्टाळा) या अतिदुर्गम पहाडी आडमार्गाने गणेशपूर (तेलंगाणा) बैल बाजारात नेले जात होते. यात शासनाकडून अनुदानात मिळालेला बैलही होता. या बैलाच्या कानाला बिल्ला क्रमांक एम.एल.डी.बी. न्यु इंडिया ३७००१२१९७९२० लावला होता. बैल नेणाऱ्या इसमाजवळ कोणतेच कागदपत्र नव्हते. सदर बैल कवळजी ता. बल्लारपूर येथून आणला असल्याचे त्याने सांगितले.खरेदीदाराचे एजंट गावोगावी फिरून बैल खरेदी करतात. त्यानंतर कवडजी, आक्सापूर, कवीठपेठ या ठिकाणी डेपोवर बैल गोळा करून बगलवाही (कोष्टाळा) मार्गाने गणेशपूर बाजारात नेले जात आहे. तेथे दररोज शेकडो बैल येतात. हैद्राबाद, आदिलाबाद, करीमनगर येथील मोठे व्यापारी बैलाची खरेदी करून कटाईसाठी ट्रकमध्ये घेऊन जातात. सध्या शेतकरी आर्थिक समस्या सोडविण्यासाठी नाईलाजाने बैल विकत आहे.यंदा नापिकी, वन्यप्राण्यांचा हैदोस, शेतमालास कमी भाव, फसलेली कर्जमाफी, यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्यावर पर्याय म्हणून बैल विकावे लागत आहे.- भीमराव बंडी, सरपंच व शेतकरी, ग्रा.पं. लक्कडकोट.