जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २३ हजार ४३७ वर पोहोचली आहे. सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ८७४ झाली आहे.. सध्या १६६ बाधितांवर उपचार सुरू आहे.. आतापर्यंत दोन लाख १० हजार ५११ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक लाख ८५ हजार २५० नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ३९७ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी जिल्ह्यातील ३५९ बाधितांचा मृत्यू झाला. तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १८, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. आज बाधित आढळलेल्या ५५ रुग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील २०, बल्लारपूर चार, भद्रावती आठ, मूल तीन, सावली दोन, राजुरा दोन, चिमूर चार, वरोरा १० व इतर ठिकाणच्या दोन रुग्णांचा समावेश आहे.
एकाच दिवशी ५५ कोरोना पॉझिटिव्ह, संसर्गाचा धोका वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 4:30 AM