शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

एकाच दिवशी सहा लाखांचा दारूसाठा पकडला

By admin | Published: April 12, 2015 12:43 AM

१ एप्रिलपासून जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यात आली आहे.

अवैध विक्री सुरूच : आतापर्यंत जिल्ह्यात १५ लाखांवर दारू जप्तबाबूपेठ (चंद्रपूर) : १ एप्रिलपासून जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यात आली आहे. बंदीच्या काळात तळीरामांची गरज भागविण्यासाठी अवैध दारुविक्रत्यांनी दारूचा मोठा साठा साठवून ठेवला आहे. अशा दारु विक्रत्यांचा शोध घेत पोलिसांनी धाडसत्र सुरू केले आहे. असे असले तरी आजही छुप्या मार्गाने दारुची विक्री सुरुच आहे. दरम्यान काल शनिवारी रामनगर पोलिसांनी एकाच दिवशी तब्बल सहा लाखांची देशी-विदेशी दारु जप्त केली आहे. जिल्हात आजवर झालेल्या कारवायांमध्ये ही मोठी कारवाई मानली जात आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत जिल्ह्यात १५ लाखांपेक्षा अधिक किमतीची दारू पोलिसांनी पकडली आहे. नागपूर मार्गावरील बलवीर सिंग चढ्ढा यांच्या बंद बिअरबारमध्ये दारूसाठा असल्याची गोपनीय माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे रामनगर पोलिसांनी बंद बारवर धाड टाकली. यात तब्बल १०० पेट्या विदेशी दारु आढळून आली. या दारुची किंमत सहा लाख रुपये असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. हा दारुचा साठा बारमागील टिनेच्या शेडमध्ये लपवून ठेवण्यात आला होता. हा दारु साठा छुप्या मार्गाने विकला जात असावा, असा पोलिसांचा अदांज आहे. आतापर्यंत झालेल्या दारूविरुध्दच्या कारवायांमध्ये रामनगरची ही कारवाई सर्वात मोठी आहे. ही कारवाई ठाणेदार प्रल्हाद गिरी, डिबी पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक बारसे, श्याम बारसागडे, प्रमोद कोटनाके राकेश बंजारीवाले, बलकी, बोरीकर, तिवारी आदींनी केली. (प्रतिनिधी)जलनगरमधील दारू अड्डे उद्ध्वस्तदारूबंदीनंतर सध्या जलनगरमधील दारुविक्री जोमात सुरु होती. या दारु विक्रीवर आळा बसविण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. या परिसरात होत असलेल्या दारु विक्रीमुळे पोलिसांविषयी जनतेचा रोषही वाढत चालला होता. पोलिसांनी अनेकदा या परिसरात धाडी मारल्या. पण ठोस असे काही हाती आले नाही. यामुळे पोलीसही अस्वस्थ होते. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन यांच्या मार्गदक्षनाखाली पोलीस मुख्यालय व रामनगरचे ठाणेदार प्रल्हाद गिरी यांच्या उपस्थितीत पोलिसांनी शनिवारीच जलनगरमध्ये सर्च मोहीम सुरु केली होती. यात पोलीसांनी सात आरोपींना अटक करुन ५० हजाराचा देशी दारुचा माल जप्त केला आहे. हा दारुसाठा झुडुपांमध्ये तर काही साठा तलावातील पाण्यात लपवून ठेवण्यात आला होता. अटक केलेल्या अरोपींमध्ये महिलांचा समावेश असून गिता खंजर, मंदा खंजर, उषा खंजर, आरती खंजर, मिरुपा खंजर, शांती खंजर, घनशाम खंजर अशी आरोपींची नावे आहेत. ‘एकच प्याला’साठी तळीरामांची जिल्ह्याबाहेर धावगोवरी : चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून राज्य शासनाने दारूबंदीचा निर्णय घेऊन कठोर अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे नेहमी दारू पिणाऱ्या मद्यपींची चांगलीच तारांबळ उडाली आहे. त्यामुळे दारूची हौस पुरविण्यासाठी तळीरामांनी जिल्हाबाहेर धाव घेतली आहे. चंद्रपूर जिल्हा दारूबंदीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत. जिल्ह्यात दारूचा महापूर सुरू असताना चंद्रपूर जिल्ह्याला दारूमुक्त करावे अशी हाक सामाजिक संघटनांनी दिली होती. निवडणूक काळात दारूबंदीचा शब्द देणारे राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विजयाचा जल्लोष साजरा करीत चंद्रपूर जिल्हा दारूबंदीवर शिक्कामोर्तब केले. यासाठी जिल्ह्यातील महिलांचा सहभाग मोठा आहे. राज्य शासनाने १ एप्रिलपासून घेतलेल्या चंद्रपूर जिल्हा दारूबंदीच्या निर्णयाने तळीरामांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्याला यवतमाळ, गडचिरोली व तेलंगणा राज्याची सीमा लागून असल्याने दारूची हौस पुरविण्यासाठी मद्यपी जिल्हाबाहेर जाऊन दारूचा मनसोक्त आस्वाद घेत आहेत. यासाठी ते जिल्ह्याबाहेरील नातेवाईकांकडे जाऊन मुक्कामाला राहून दारूची हौस पुरविताना दिसत आहे. यातून जिल्हाबाहेरून दारूची तस्करी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध धाडसत्र मोहीम धडाक्यात सुरू आहे. मात्र तळीरामांनी जिल्ह्याबाहेर जाऊन दारू पिण्याचा नवा फंडा अवलंबला असल्याने पोलीस यंत्रणा काही प्रमाणात हतबल आहे. पोलिसांनी दारू पिणाऱ्यावर आठवडाभरापासून करडी नजर ठेवली असून जिल्ह्याबाहेर सीमेवर दारूची तस्करी रोखण्याच्या उद्देशाने पोलिसांकडून नागरिकांची कसून चौकशी करण्यात येत आहे. (वार्ताहर)