रेती तस्करी
कोरपना : कोरपना तालुक्यातील काही ट्रॅक्टर धारकांनी महसूल विभाग यांना हाताशी धरून.व प्रदीप कुळमेथे यांनी आपले शेतातून नदीत जाण्यासाठी रस्ता तयार करून आपले मर्जीतील तीन ते चार ट्रॅक्टर धारक यांना परवानगी देऊन मोठ्या प्रमाणात रेतीचे वाहतूक रात्रीच्यावेळी करीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून माहिती मिळाली. या मार्गी अनेक दिवसापासून रेती तस्करी होत आहे. मात्र कोरपना तालुक्यातील महसूल विभागाला खरोखरच माहिती नाही. का असा सवाल नागरिक करीत आहे. जर माहित असेल तर रेती तस्करी यांच्या मुसक्या का आवरत नाही. कुठेतरी पाणी मुरते का सवाल नागरिक करीत आहे. अनेक घरकुल यांना रेती मुळे अर्धवट घर बांधकाम आहे काही घरकुल यांना स्वतःचं घराच काम अर्धवट असल्यामुळे दुसऱ्याच्या जागेवर झोपडी टाकून राहावे लागत आहे. आमचं स्वतःचं घर केव्हा होईल असे आतुरतेने वाट पाहणारे घरकुल बांधकाम यांना रेती मिळत नसल्यामुळे वाट पाहण्यात वेळ जात आहे. मात्र मोठ्या मोठ्या घर बांधकाम यांना सात ते आठ हजार रुपये घेऊन रेती तस्करी करत आहे याकडे महसूल विभाग यांनी त्वरित लक्ष देऊन रेती तस्करी बंद करून् व रेती घाट लिलाव करून घरकुल बांधकाम यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा घरकुल लाभार्थी करत आहे. व रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर धारकांना दंड ठोकण्यात यावा, अशी मागणी सुद्धा नागरिक करीत आहेत.