सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
घुग्घुस : अवैध रेती वाहतूक करणाऱ्या अज्ञात ट्रॅक्टरने पोलीस ठाण्यानजीकच्या एसीसीच्या रेल्वे गेटला जबर धडक दिली. त्यात लोखंडी पाईपचे गेट तुटले. मात्र, एसीसीकडून येत असलेल्या इंजिनवर ट्रॅक्टर आदळले असते तर मोठी घटना घडली असती.
सदर घटना मंगळवारी रात्री ९.१५ वाजताच्यादरम्यान घडली. यादरम्यान रस्त्यावरील वाहतूक थांबली होती. रेल्वे विभागाने रात्रीच गेट दुरुस्ती केली आणि रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. गावातून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला मनाई करा, अशी मागणी घुग्घुस पोलिसांना वारंवार नागरिक करत असले तरी मागणीकडे त्या मागणीची दखल घेतल्या जात नाही आणि नेहमी अपघात घडत असते. तोच प्रकार रात्री पोलीस ठाण्याच्या समोरील एसीसीकडे जाणाऱ्या रेल्वे गेटजवळ घडला. एसीसीकडून रेल्वे येत असल्याने गेटमनने सायरन वाजवत गेट बंद करत असताना अवैध रेती वाहतूक करणाऱ्या अज्ञात ट्रॅक्टर चालकाने गेट लागण्यापूर्वी निघून जाण्याच्या प्रयत्नात गेटला धडक दिली. दरम्यान, रेल्वे इंजिन चालकाला दिसल्याने परत ट्रॅक्टर रिव्हर्स घेऊन पळ काढला. प्रसंगावधान साधला नसता तर रेल्वे इंजिनवर ट्रॅक्टर आदळला असता. सदर घटनेतील ते अज्ञात ट्रॅक्टर कोणाचा याचा शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
===Photopath===
020621\img_20210602_164936.jpg
===Caption===
घुग्घुस पोलीस ठाण्या नजिक च्या एसीसी चे तुटलेले रेल्वे गेट व इंजन