लोकमत न्यूज नेटवर्कखडसंगी : अस्पृश्यता लादलेल्या समाजाला अंध:कारातून युगप्रवर्तकाने ज्ञानाच्या प्रकाशात आणले. ३१ जानेवारी १९२० रोजी बाबासाहेबांनी 'मूकनायक ' हे मुखपत्र काढून मुक्तीचा संग्रामाची सुरुवात केली होती. समाजाला समतेचा सूर्य दाखविला. मागील २५ वर्षांपासून तपोभूमी संघराम गिरी येथे या धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या धम्म क्रांतीचे साक्षीदार होण्यासाठी भारतातील लाखो निळ्या पाखरांनी गुरुवारी या ऐतिहासिक भूमीत येऊन वंदन केले.सम्राट अशोकाच्या काळापासून बौद्ध भिक्खू व उपासक-उपासिकांच्या साधना अधिष्ठाण करण्याची भूमी अशी ओळख असलेल्या साधनाभूमीत मागील २५ वषार्पासून महाराष्ट्र उपासक-उपासिका संघाच्या वतीने आयोजित केला जात असलेल्या द्विदिवसीय धम्म समारंभाकरिता देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो धम्मबांधवांचे थवे दाखल झाले होते. बुधवारी दिवसभर विविध कार्यक्रम व रात्री महापरित्राण पाठाकरिता कडाक्याच्या थंडीतही धम्मबांधवांची लक्षणीय उपस्थिती होती. महास्थवीर भदंत ज्ञानज्योती यांनी अष्ठशील वंदन केले. याप्रसंगी मंचकावर समारंभाचे अध्यक्ष महास्थवीर शिलानंद अखिल भारतीय भिक्खू संघ व शेकडो भिक्खू उपस्थित होते. गुरुवारी समारोपीय कार्यक्रमात अस्पृश्यता मुक्ती लढ्याचे बिगुल फुंकणाऱ्या बाबासाहेबांच्या अजरामर कार्याचा व इतिहासाचे स्मरण भावी पिढीला करून देण्यासाठी सम्यक क्रांतीच्या इतिहासाला नव्याने उजाळा देण्यात आला.मान्यवरांनी दिला संदेश धम्म चळवळ गतिमान करा- भदंत ज्ञानज्योतीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमीवरील धम्मदीक्षा समारोहातून अनुयायांना संबोधित करताना बौद्धमय भारत निर्माण करण्याचे स्वप्न बघितले होते व अनुयायांना संदेश दिला होता. त्याच स्वप्नपुर्तीसाठी तुमची जबाबदारी व समाजाप्रती असलेली जाणीव ओळखून बौद्धमय भारत निर्माण करण्यासाठी धम्म चळवळ गतिमान करा, असा संदेश भिक्खू संघ, संघरामगिरीचे संघनायक महास्थवीर भदंत ज्ञानज्योती यांनी उपस्थित धम्मबांधवाना दिला.विपश्यनेतून मानवी जीवनाचे कल्याण- महास्थवीर शिलानंदसमग्र मानव जातीचे कल्याण भगवान बुद्धांच्या धम्म आचरणातून होते व त्रिशरण, पंचशील अंगिकारून एक आदर्श व्यक्तिमत्व निर्माण होते. तथागतांच्या प्रणालीनुसार विपश्यना करून आपल्याला स्वत:वर नियंत्रण मिळविता येत असून अनुयायांनी विपश्यनेत सहभागी व्हावे. कारण मानवी जीवनाचे कल्याण करणारी अत्यंत महत्त्वाची प्रणाली आहे, असे प्रतिपादन समारंभाचे अध्यक्ष महास्थवीर शिलानंद धम्मबांधवाना मार्गदर्शन करताना केले.
संघरामगिरी भूमीला लाखो धम्मबांधवांनी केले वंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 10:45 PM
अस्पृश्यता लादलेल्या समाजाला अंध:कारातून युगप्रवर्तकाने ज्ञानाच्या प्रकाशात आणले. ३१ जानेवारी १९२० रोजी बाबासाहेबांनी 'मूकनायक ' हे मुखपत्र काढून मुक्तीचा संग्रामाची सुरुवात केली होती. समाजाला समतेचा सूर्य दाखविला. मागील २५ वर्षांपासून तपोभूमी संघराम गिरी येथे या धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या धम्म क्रांतीचे साक्षीदार होण्यासाठी भारतातील लाखो निळ्या पाखरांनी गुरुवारी या ऐतिहासिक भूमीत येऊन वंदन केले.
ठळक मुद्देमहामानवाचा जयघोष : अवतरली ‘निळी पाखरे’