राजीव गांधी उद्यानाची स्वच्छता : परिसर झाला निटनेटका
चंद्रपूर : येथील पठाणपुरा गेट जवळ असलेल्या राजीवगांधी उद्यानाची स्वच्छता अभियान राबवून सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षांनी आपले कर्तव्य पार पाडले.
या अभियानामध्ये निसर्ग व सामाजिक पर्यावरण व प्रदूषण निवारण मंडळ, अजय बहुउद्देशीय संस्था, स्नेहराई वृक्षरोपण व वृक्ष संवर्धन फाऊंडेशन, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभाग आदी संस्थांनी यामध्ये सहभाग घेतला.
येथील पठाणपुरा गेटजवळ असलेल्या राजीव गांधी उद्यान परिसरामध्ये काही प्रमाणात अस्वच्छता झाली होती. दरम्यन, अखिल भारतीय काँग्रेस कमेटिच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यवेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पर्यावरण विभाग चंद्रपूर जिल्हाध्यक्षांच्या वतीने स्वाती राजेश धोटकर यांच्या नेतृत्वाखाली अभियान राबविण्यात आले. यावेळी चित्रा डांगे, अनिता बोबडे, कमल अलोने, योगीता धनेवार, वैशाली भागवत, सोनाली हेडाऊ, प्रनिता बोरकर, स्वाती बच्छुवार, वर्षा बोरकर, यांच्यासग निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष महेश शेंडे, जिल्हा सचिव महेश किन्नाके, तालुका अध्यक्ष चेतन बोबडे, शहर अध्यक्ष सतीश गोहोकार, अजय बरडे, अक्षय वरोरकर, प्रफुल्ल डवरे, अंकित कावळे, तेजस नवले, अिनकेत डाखरे, कार्तिक धोले, अतीश टोले, विशाल शेंडे, आकाश ताळे, अमल मोहुर्ले आदींनी यावेळी सहभाग नोंदविला.