मासळ बु : कोरोना आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गावातील नाल्या व संपूर्ण गावात जंतूनाशक सॅनिटायझर फवारणी करण्यात आली.
गावातील ४५ वर्षावरील ग्रामस्थांना कोविड लस घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आली. माझं गाव, माझी जबाबदारी' उपक्रमांतर्गत ग्रामस्थांनी नेहमी मास्क वापरावे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद ठेवत सामाजिक आंतर पाळावे, विनाकारण घराबाहेर फिरू नये, १८ वर्षांवरील नागरिकांनी लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी सरपंच विकास धारणे, उपसरपंच प्रमोद खापर्डे, ग्रामसेवक प्रशांत लामगे, ग्रामपंचायत सदस्य वामन बांगडे, संजय धारणे, ललिता बन्सोड, रंजना बन्सोड, अनिता ननावरे, गायत्री खामनकर, मनीषा गराटे, शिपाई रवींद्र दडमल, सुनील सूर आदी उपस्थित होते.