मागील काही वर्षांपासून भद्रावती तहसील येथील संजय गांधी निराधार योजना समिती स्थापित झाली नव्हती. त्यामुळे लाभार्थ्यांचे बरेच अर्ज पेंडिंग होते. नवीन लाभार्थ्यांना याचा लाभ मिळत नव्हता. नुकतीच खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती स्थापन करण्यात आली व संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षतेखाली प्रकाश काळे यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती होताच जानेवारी व फेब्रुवारीमध्ये झालेल्या दोन्ही बैठकांमध्ये हे प्रकरण निकाली काढण्यात आले. या बैठकीत तहसीलदार महेश शितोळे, नायब तहसीलदार भांदककर, वसंता मानकर, सूरज गावंडे, चंद्रकांत दानव, किशोर पडावे, विनोद वानखेडे, वर्षा ठाकरे, अशोक ताजने, आदी सदस्य उपस्थित होते. समितीसमोर एकूण ५४२ अर्ज सादर केले. त्यात १०३ अर्जामध्ये त्रुटी निघाल्याने ४५३ लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला. त्यात संजय गांधी निराधार योजना २१३, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना १४७, इंदिरा गांधी वृद्धापकाळ विधवा निवृत्ति वेतन योजना ६९ यांसह, आदी लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे.
संजय गांधी निराधार योजनेत दोन महिन्यांत ४५३ लाभार्थ्यांना लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:28 AM