लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपुरातील श्री कन्यका शारदोत्सव महिला मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘उंच माझा झोका’ या कार्यक्रमात श्री तिरूपती बालाजी देवस्थान ट्रस्टच्या सदस्य सपना सुधीर मुनगंटीवार यांना ‘कर्तृत्वशालिनी’ हा पुरस्कार बहाल करीत सिनेअभिनेत्री डॉ. निशीगंधा वाड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलांचा नवरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सिनेअभिनेत्री डॉ. निशीगंधा वाड, सपना मुनगंटीवार, अभिनेत्री अमृता उत्तरवार, पही पाठक, मंडळाच्या अध्यक्ष शिल्पा चिल्लरवार, संगिता सिध्दमशेट्टीवार, शुभांगी माडुरवार, श्रध्दा मुनगंटीवार, अमृता तुम्मूरवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी डॉ. निशीगंधा वाड म्हणाल्या, आज महिलांनी स्त्रीत्व, प्रभुत्व, मातृत्व आणि पुर्णत्व या माध्यमातून स्वत:चे वर्चस्व सर्वच क्षेत्रात सिध्द केले आहे. स्त्री ही आदीशक्ती आहे. या शक्तीचा आदर व सन्मान करत कन्यका शारदा महिला मंडळाने खºया अर्थाने स्त्रीयांच्या कर्तृत्वाचा सन्मान केला आहे. स्त्रीयांच्या पंखांना बळ देत संस्कृतीच्या जपणुकीचे मंडळाचे हे कार्य अभिनंदनीय आहे.यावेळी श्री तिरूपती बालाजी देवस्थान ट्रस्टच्या सदस्य तथा सत्कारमूर्ती सपना मुनगंटीवार म्हणाल्या, आपल्या कर्तृत्वाने सर्वच क्षेत्रे काबीज करणाऱ्या स्त्रीयांनो आपल्या उत्तुंग कार्याचा झोका उंच आकाशी न्या. स्त्रीयांमधील विविध सुप्त कलागुणांना चालना देत आज स्त्री शक्तीचा जागर आयोजित करण्यात आला आहे. कन्यका महिला मंडळ म्हणजे स्त्रीयांमध्ये आत्मभान जागविणारी संस्था आहे. आज महिलांनी रिक्षा चालविण्यापासून अंतराळ यान चालविण्यापर्यंत झेप घेतली आहे, असेही त्या म्हणाल्या.माझ्या वाटचालीतही तिचा सिंहाचा वाटा-मुनगंटीवारयावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आयोजनाचे विशेष कौतुक केले. नुकताच आयफा अवार्ड समारंभ बघण्याचा योग आला. आज हा सोहळासुध्दा त्याच दर्जाचा झाला. मात्र त्याठिकाणी व्यावसायिक भाव होता आणि या ठिकाणी स्नेहभाव आणि प्रेमभाव होता. आपुलकीचा ओलावा होता. आज माझी पत्नी सपनाचा या ठिकाणी सत्कार झाला. माझ्या राजकीय व सामाजिक कार्याच्या वाटचालीत तिचा सिंहाचा वाटा आहे. मी राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना कौटुंबिक आघाडया ती समर्थपणे सांभाळते. त्यासोबतच सामाजिक कार्यातही ती अग्रेसर असते.
सपना मुनगंटीवार कर्तृत्वशालिनी पुरस्काराने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:04 PM