सर्दी, ताप, खोकला, श्वसनाचा त्रास आदी कोरोनासदृश लक्षणे असल्याने सुरुवातीच्या काळात आरोग्य यंत्रणेद्वारा लक्ष देण्यात आले. त्यानंतर फारसे गंभीर्याने घेण्यात आले नसल्याची वस्तुस्थिती आहे. सारीच्या रुग्णांमध्ये दम घ्यायला त्रास, सर्दी, ताप खोकला अशी तीव्र स्वरुपाची लक्षणे आढळून येतात. तर इलीमध्ये सर्दी, खोकला, ताप अशी सौम्य लक्षणे आढळून येतात. परंतु, या रुग्णांना कोरोना असल्याची दाट शक्यता असते. आतापर्यंत जिल्ह्यात ६९० सारीच्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ४८५ रुग्ण बरे झाले असून सध्या स्थितीत १८४ रुग्ण पॉझिटिव्ह असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर इलीची २५६९ रुग्णांची नोंद झाली असून २१५९ रुग्ण बरे झाले. तर ४०६ रुग्ण पॉझिटिव्ह असून आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. मागील दोन महिन्यात जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामध्ये सारीचा शिरकाव धोकादायक मानला जात आहे.
बॉक्स
सारीचे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असण्याची शक्यता
सारीच्या रुग्णांची लक्षणे ही कोरोनासारखीच असतात. अशा व्यक्तीची पहिले अँटिजेन तपासणी केली जाते. ती तपासणी निगेटिव्ह आल्यानंतर आरटीपीसीआर तपासणी केली जाते. बहुतांश सारीची लक्षणे असणारे रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
कोट
सारी व इलीचे रुग्ण आढळल्यास त्यांची कोरोना तपासणी केली जाते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार केला जातो. नागरिकांना कोरोना सदृश लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन कोरोना तपासणी करावी.
-डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, चंद्रपूर.