येथील तहसील कार्यालयाने अध्याशी अधिकाऱ्यांची यादी प्रसिद्ध केली. त्यात ही माहिती देण्यात आली. यानुसार ११ फेब्रुवारी रोजी तळोधी, सावरगाव, वाढोणा, कानपा, बिकली, मोहाळी, मिंडाळा, कोटगाव, कोथुळणा, चिंधीचक, जनकापूर, किटाळी बोर, पळसगाव खुर्द, ओवाळा आणि पाहार्णीची सरपंचपदाची निवडणूक होणार आहे.
१३ फेब्रुवारीला ढोरपा, मौशी, पेंढरी बरड, विलम, म्हसली, पान्होळी, किरमिटी, कोर्धा, पांजरेपार, कोसंबी गवळी, नवेगाव हुंडे, सोनुली बुज, वैजापूर आणि बोंड या ग्रामपंचायतींची, तर १५ फेब्रुवारी रोजी कन्हाळगाव, नांदेड, कोजबी माल, चारगाव चक, वलनी आकापूर, आलेवाही, चिकमारा, बालापूर खुर्द, बाळापूर बुज, देवपायली, मांगरूड आणि मेंढा किर, या ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडणार आहे.
सरपंच निवडीचे पत्र हाती पडताच गावातील राजकीय हालचालींनी गती प्राप्त केली आहे. गावात आपल्याच विचारसरणीचा सरपंच निवडला जावा, यासाठी नेतेही सरसावले आहेत. यातूनच पळवापळवीचे प्रकार वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.