शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

येल्लापूरच्या सरपंचाने थाटला समाज भवनात संसार

By admin | Published: March 10, 2017 2:00 AM

गावातील समाज बांधवांना सामाजिक कार्यक्रम व इतर कार्य करण्यासाठी एकत्र बसण्याची सोय व्हावी,

सरपंचाची हुकूमशाही : चौकशी करून कारवाई करण्याची मागणीजिवती : गावातील समाज बांधवांना सामाजिक कार्यक्रम व इतर कार्य करण्यासाठी एकत्र बसण्याची सोय व्हावी, यासाठी शासनाने आमदार निधीतून येल्लापूर येथील गोंडगुडा येथे सामाजिक सभागृहाचे बांधकाम करून दिले. मात्र त्या सभागृहाचा वापर सामाजिक कायार्साठी न होता खुद सरपंचानेच आपला आटाचक्की व संसार चालविण्यासाठी करीत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी व संवर्ग विकास अधिकारी जिवती यांच्याकडे नागरिकांनी केली आहे. जीवती तालुक्यातील येल्लापूर ग्रामपंचायतीमध्ये चार गावे येत असून येथील लोकसंख्या १ हजार २५४ तर कुटुंब संख्या ४१८ आहे. गावात नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जातात. हे उपक्रम राबविण्यासाठी सामाजिक सभागृहाची गरज नेहमीच पडत असते. परंतु सभागृह असूनही समाज कायार्साठी उपयोगी पडत नाही. गेल्या कित्येक वषार्पासून येथील सरपंच माधव कान्हु पेंदोर यांनी आपली हुकुमशाही दाखवित समाज भवनात अटाचक्की लावून संसार थाटल्याचा प्रकार गावकऱ्यांनी उजेडात आणला आहे. याबाबत नागरिकांनी जिवतीचे संवर्ग विकास अधिकारी व ग्रामसेवक यांना लेखी तक्रारी दिल्या होत्या. मात्र त्याकडे कोणीही लक्ष न दिल्याने नागरिकांना मोठी अडचण निर्माण होत आहे. एकीकडे सरपंच म्हणजे गावचा पुढारी समजला जातो. त्यांच्या देखरेखीखाली गावातील संपुर्ण विकास कामे राबविताना पाहायला मिळतात. तर दुसरीकडे मात्र आपली हुकुमशाही दाखवून समाज भवनात संसार थाटतो अन् संबंधित विभाग याकडे कानाडोळा करतो, याला काय म्हणावे?सन १९९२-९३ मध्ये येल्लापूर ग्रामपंचायतीमध्ये जलद सिंचाई विभागामार्फत तलावाचे काम पूर्ण करण्यात आले. त्याच तलावात अतिक्रमण करून माजी सरपंच सोनेराव पेंदोर यांनी विहिर खोदून शेतीसाठी पाणी वापरत असल्याने पाणी टंचाई जाणवत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. सरपंच माधव कान्हु पेंदोर व माजी सरपंच सोनेराव पेंदोर हे दोघेही सख्खे भाऊ आहेत. त्यांचा अनेक वर्षापासून या ग्रामपंचायतीवर ताबा आहे. त्यामुळे हुकुमशाही दाखवित असून चौकशी करून कारवाईची मागणी तक्ररारीतून केली आहे. (तालुका प्रतिनिधी)