लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मुलींच्या संसारात माहेरकडील व्यक्ताचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. परिणामी अनेक सासर उद्धवस्त होत असल्याचे प्रतिपादन नंदकिशोर मैंदळकर यांनी केले.भारतीय परिवार बचाव संघटनेचे एक दिवसीय जिल्हा संमेलन काँग्रेस सेवादल चंद्रपूर येथे नुकतेच पार पडले. यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.कार्यक्रमाचे उद्घाटन सिमा शेषराव रणदिवे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संघटनेचे सचिव सुदर्शन नैताम, मनीष चौधरी तर प्रमुख पाहुणे डॉ. राहुल विधाते, शेषराव रणदिवे, संजय जंपलवार, गोपी आक्केवार, सचिन बरबटकर, अनिल राजू कांबळे, शितल साळवे, अमोल कांबळे, नितीन चांदेकर, वतन लोणे, दीपक पराते आदी उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शन करताना मैंदळकर पुढे म्हणाले, भारतीय कुटुंब व्यवस्था ही जगातील आदर्श कौटुंबिक व्यवस्था आहे. मात्र अलीकडच्या काळात ही संस्था लोप पावत आहे. कुटुंबाचा कणा समजल्या जाणारा पुरुष मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत असल्याचे नॅशनल क्राईम रेकार्डस ब्युरोच्या अहवालातून समोर आले असल्याचे ते म्हणाले. यावेळी हुंडाबळी ४९८ अ.गृह हिंसाचार कायदा २००६, पोटगी यावर विचार मंथन करण्यात आले. संचालन सचिन बरबटकर तर आभार अमोल कांबळे यांनी मानले.
संसारात माहेरच्या हस्तक्षेपामुळे सासर उद्ध्वस्त - मैंदळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 10:33 PM