आॅनलाईन लोकमतब्रह्मपूरी : संकट आले तर महिलांनी मागे वळायच नाही. धैर्याने उभे रहा. मुलींनो संपूर्ण कपडे घाला, तुमच्याकडे पाहिल्यानंतर माय आठवली पाहिजे. सावित्री, जिजाऊ, सिंधुताई नववारीत अन् तुम्ही दोनवारीत, असे चालणार नाही. महाराष्ट्रात माती, निती, अन् संस्कृती हातात हात घेऊन चालते, असे भावनिक आवाहन अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांनी केले. त्या ब्रह्मपुरी महोत्सवात ‘काळजातील माय’ या कार्यक्रमात बोलत होत्या.यावेळी मंचावर आ. विजय वडेट्टीवार, किरण वडेट्टीवार, प्राचार्य डॉ. देविदास जगनाडे, मारोतराव कांबळे, अॅड. गोविंद भेंडारकर, रश्मी पेशने उपस्थित होते. यावेळी देशासाठी शहिद झालेल्या प्रफुल्ल मेहरकर यांच्या वीर मातापित्याचा सिंधुताईच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी परिसरातील शेकडो महिलांनी गर्दी केली होती.यावेळी अनेकांनी अनाथाच्या मायी सिंधुताई सपकाळ यांना सढळ हाताने मदत केली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अमीर धमानी तर आभार डॉ. मोहन वाडेकर यांनी मानले. ब्रह्मपुरी महोत्सवात विविध कार्यक्रम व उपक्रम राबविले जात असून परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती आहे.आरोग्य शिबिराचा लाभ घ्या : विजय वडेट्टीवारजनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. जनसेवेच्या माध्यमातून महिला-पुरुष वर्गाचे आरोग्य सुदृढ रहावे, याकरिता ब्रह्मपुरी महोत्सवाच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक आ. विजय वडेट्टीवार यांनी केले. महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगर परिषद उपाध्यक्ष रश्मी खानोरकर माजी पं.स. सभापती नेताजी मेश्राम, माजी नगराध्यक्ष वनिता ठाकूर, नगरसेविका प्रतिमा फुलझेले, योगिता आमले उपस्थित होत्या. या शिबिरात तज्ञ डॉक्टरच्या हस्ते जवळपास १००० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. प्रितमकुमार खंडाळे, डॉ. शेख, डॉ. सतीश मेंढे, डॉ. भारत गणवीर व अन्य कर्मचाºयांचा सहभाग होता.
संस्कृतीचे जतन करा : सिंधुताई सपकाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 11:55 PM