शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

निसर्गरम्य सिंधबोडी तलाव उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 11:02 PM

तालुक्याला समृध्द वनवैभवाची परंपरा आहे. कचेपार जंगलातील निसर्गरम्य सिंधबोडी तलावाचा परिसर पर्यटनक्षेत्र नागरिकांचे लक्ष वेधून घेऊ शकतो.

ठळक मुद्देपर्यटन क्षेत्र विकसित करा : वन्यजीवप्रेमी संघटनेची मागणी

आॅनलाईन लोकमतसिंदेवाही : तालुक्याला समृध्द वनवैभवाची परंपरा आहे. कचेपार जंगलातील निसर्गरम्य सिंधबोडी तलावाचा परिसर पर्यटनक्षेत्र नागरिकांचे लक्ष वेधून घेऊ शकतो. त्यामुळे तलावास विकसीत करण्यासाठी शाासनाने आराखडा तयार करावा, अशी मागणी तालुक्यातील वन्यप्रेमी संघटनांनी केली आहे.सिंदेवाही तालुका वनवैभवाने नटलेला आहे. याच तालुक्यात सिंधबोडी तलाव असून सभोवताल घनदाट जंगल आहे. विविध प्रकारचे वन्यप्राणी व पक्षी या तलावावर येतात. प्रत्येक हंगामा विदेशी पक्षीदेखील पिंगा घालतात. पर्यटनाच्या दृष्टीने योग्य ठिकाण असतानाही वनविभागाने सिंधबोडी तलावाचा परिसर पर्यटनक्षेत्र म्हणून विकसीत करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. सिंदेवाही वनपरिक्षेत्राच्या कचेपार जंगलातील कक्ष क्रमांक १३५ मध्ये सिंधबोडी तलावाचा परिसर एक रमणीय स्थळ म्हणून हमखास प्रसिद्धिस येऊ शकतो. सिंदेवाहीपासून १० किलोमीटर अंतरावर कचेपार हे गाव घनदाट जंगलात आहे.कचेपारपासून पूर्वेस ५ किलोमीटर अंतरावर सिंधबोडी तलाव केवळ ५ किेमी अंतरावर येते. हे ठिकाण जंगलाच्या मध्यभागी आहे तलावास लागूनच खैरी व पवनपार तलाव आहेत. त्यामुळे सिंधबोडी तलावात भरपूर पाण्याचा साठा उपलब्ध होतो. तसेच तलावाला लागून डोंगर असल्यामुळे या ठिकाणी वन्यप्राण्यांना राहण्यासाठी नैसर्गिक वातावरण निर्माण झाले आहे. तलावाच्या परिसरात मुक्तपणे हिंडणारे पशुपक्षी व वनराई पाहून पर्यकांची मने आकर्षित होतात. ४९६ चौरस हेक्टर क्षेत्रातील कचेपार जंगल सिंधबोडी तलाव १० हेक्टर परिसरात पसरलेला आहे. तलावात बारामाही जलसाठा उपलब्ध असते.तलावाच्या सभोवताल घनदाट जंगल आहे. त्यात विविध वन्य प्राण्यांचा नेहमी संचार असतो. परिणामी मोठ्या संख्येने तृणभक्षी, मासभक्षी, वन्यप्राणी, सरपटणारे प्राणी येतात. औषधोपयोगी वनस्पती व मोठ्या वृक्षांची समृध्दता आहे. या परिसरात रानगवे, हरिण, सांबर, चितळ, भेडकी आदी तृणभक्षी प्राणी सहजपणे पाहायला मिळतात. साग, येन, बिजा, मोह, सालई, धावडा, किन्ही, पळस, अंजन, आवळा, हिरडा, बेहडा, चारोळी व इतर फळ झाडाची मोठी विपूलता दिसून येते. या तलवात परदेशी पाहुणे लाल तोंडाचा करकोचा, पांढरा बडा, बारडी, पानकवडी, आस्ट्रेलियन आणि भारमातील अनेक प्रकारचे पक्षी पाण्यात विहार करताना आढळून येतात.हरिण, सांबर, चितळ, चौरसिंग, भेडकी, माकड, रानगवे, रानडुक्कर, ससा, अस्वलांचे कळप सहजपणे दिसतात. मोर, लांडोर, लावे, तितीर पक्ष्यांचा आवाज नेहमीच येत राहतो. लांब पिसारा असलेले मोर मनसोक्त फिरताना आढळून येतात. सायंकाळी पट्टेदार वाघ, बिबट, तडस, रानमांजर, रानकुत्रे व कोल्हा शिकारीच्या शोधात जंगलात भटकत असतात. त्यामुळे येथे विविध प्रकारचे वन्यप्राणी व पक्षी पाहावयास मिळतात.सर्व प्रकारचे वन्यप्राणी या तलावावर पाणी पिण्याकरिता येतात. याठिकाणी २४ तास वनकर्मचारी गस्त घालतात. बऱ्याच ठिकाणी कॅमेरा लावल्याने शिकारीला आळा बसला आहे. राज्य पर्यटन विभागाने इको टूरिझम आणि जंगल सफारी सारखे उपक्रम सुरू केल्यास या परिसराचा मोठा विकास होऊ शकेल. स्थानिक लोकप्रतिधिंनी या परिसराचा प्रश्न शासनाकडे मांडल्यास विकासाला चालना मिळू शकते, अशी अपेक्षा वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केली आहे.विकासासाठी शासनाने निधी द्यावासिंधबोडी तलावाच्या विकासासाठी शासनाने निधी दिल्यास या परिसराला चालना मिळू शकते. पर्यटन क्षेत्र झाल्यास शालेय विद्यार्थी व पर्यटकांना याठिकाणी सहलीचा आनंद घेता येईल. या वन परिसरात आकर्षक मचान तयार करण्यात आले. मचानीवरून विविध प्रकारचे वन्यप्राणी व पशुपक्षी पाहावयास मिळतात. वनविकास महामंडळाने २०१६ मध्ये गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर निसर्ग पर्यटन भ्रमंती कार्यक्रमाला सुरुवात केली होती. परंतु, सध्या पर्यटन भ्रमंती बंद आहे. शासनाने निधी देऊन विकासाचे प्रकल्प राबविल्यास हे क्षेत्र जिल्ह्यातील नागरिकांंसाठी आकर्षणाचा केंद्रबिंंदू ठरू शकते. त्यासाठी सर्वेक्षण सुरू करावी, अशी मागणी प्रभात बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष रितेश घूमे यांनी केली आहे.