स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्राचे रहिवासी असावेत, स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत, स्वयंसहायता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत, बचत गटाचे राष्ट्रीयीकृत बँकेत बचत गटाच्या नावे बँक खाते असावे, बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिवांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असावे. बचत गटांना शासनाने त्या-त्या जिल्ह्यासाठी निश्चित करून दिलेल्या उद्दिष्टानुसार अर्थसहाय्य मंजूर करून बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. योजनेच्या लाभासाठी निवड झालेल्या स्वयंसहाय्यता बचत गटांनी खरेदी केलेले मिनी ट्रॅक्टर चालविण्याचे अधिकृत संस्थेकडून प्रशिक्षण घेऊन त्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र स्वयंसहाय्यता बचत गटांनी २२ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहितीकरिता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दूध डेअरी रोड, जलनगर वार्ड, चंद्रपूर येथील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.