चंद्रपूर : कोरोना विषाणूच्या संकटामुळे मागील १४ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे स्कूलबस चालकांवर उपासमारीची वेळ आली असून, अनेकांनी भाजीपाला तसेच अन्य छोटे-छोटे काम करून उदरनिर्वाह सुरू केला आहे. विशेष म्हणजे, काही बस या शैक्षणिक संस्थांच्याच आहे. त्यामुळे अनेकांनी त्यांना या काळामध्ये पैसेही दिले नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये नैराश्याचे वातावरण आहे.
मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये कोरोनाचे संकट धडकले. तेव्हापासून शाळांना सुटी देण्यात आली. मध्यंतरी आठवी ते पुढील वर्गाचे नियमित वर्ग सुरू करण्यात आले. त्यानंतर २७ जानेवारीपासून पाचवीपासूनचे वर्ग सुरू करण्यात आले. मात्र हे वर्गही काही दिवसांचे ठरले. त्यानंतर पुन्हा कोरोनाने धडक दिल्यामुळे शाळा बंद करण्यात आल्या. एवढेच नाही तर यावर्षी परीक्षासुद्धा झाल्या नाहीत. शाळाच बंद असल्यामुळे स्कूल बसही बंद आहे. परिणामी बसचालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. जिल्ह्यातील काही शाळा स्वत:च्या बस घेऊन त्यांचे व्यवस्थापन करतात; तर काही खासगी मालकांकडून भाड्याने बस चालविल्या जातात. मात्र यामध्ये स्कूलबस चालकांना कामच उरले नसल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. काही शाळांनी मागील वर्षी या चालकांना वेतन दिले. मात्र यावर्षीही कोरोनाचे संकट कायम असल्यामुळे फी वसूलच झाली नसल्यानेे या चालकांनाही आता वेतनापासून मुकावे लागत आहे. परिणामी अनेकांनी आता भाजीपाला, फळविक्री तसेच अन्य छोटे-मोठे काम सुरू केले आहे; तर काहींनी शेतावर शेतमजूर म्हणून जाणेही सुरू केले आहे
बाॅक्स
या आहेत मागण्या
शासनाने स्कूलबस चालकांना महिन्याकाठी अनुदान द्यावे
लाॅकडाऊनच्या काळात मोफत रेशन द्यावे.
शाळा व्यवस्थापनाला सांगून किमान मानधन देण्यास लावावे.
ज्या स्कूलबस मालकांनी कर्ज घेऊन स्कूलबस खरेदी केली, त्यांचे लाॅकडाऊनच्या काळातील व्याज माफ करावे
बाॅक्स
रोजंदारीवर काम
स्कूल बसचालकांना काही शाळा प्रशासन नियमित काम देत असले तरी काही रोजंदारीवर कामावर लावतात. त्यामुळे या चालकांना शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नाही. बहुतांश शाळांना आपल्या स्वत:च्या मालकीच्या बस खरेदी केल्या आहेत. त्यामुळे चालकांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनभत्ते देणे अपेक्षित असतानाही स्कुल बस चालकांची शाळांच्या दप्तरी नोंदसुद्धा राहत नसल्याची माहिती चालकांनी दिली.
कोट
मयूर दुधे, स्कूलबस चालक
न.प.मध्ये घंटागाडी चालवतोय
मागील वर्षीपासून शाळा बंद आहे. त्यामुळे स्कूलबस बंद झाल्या. त्यामुळे हातचे काम गेल्यामुळे बेरोजगार झालो. दरम्यान, नगर परिषदेच्या घंटागाडीवर चालक पाहिजे असल्याची माहिती मिळताच ती गाडी चालवून उदरनिर्वाह सुरू केला आहे.
कोट
महेश मेश्राम, स्कूसबस चालक
सध्या बेरोजगार
शाळा बंद झाल्यामुळे स्कूल बस चालविण्याचे काम गेले. त्यामुळे सद्य:स्थितीत बेरोजगार व्हावे लागते. यावर्षी शाळा सुरू झाल्यास स्कूलबस सुरू होईल आणि काम मिळेल, अशी आशा आहे. मात्र कोरोना संकटामुळे यावर्षीही शाळा सुरू होते की नाही,अद्यापही स्पष्ट झाले नाही.
कोट
अभय तावाडे, स्कूलबस मालक
किराणा दुकान सुरू केले
टूर आणि ट्रॅव्हल्स तसेच स्कूलबसद्वारे व्यवसाय सुरू केला. मागील १३ ते १४ महिन्यांपासून शाळा बंद आहे. त्यामुळे स्कूल बस बंद पडल्या. हा व्यवसाय धोक्यात आल्यामुळे आता उदरनिर्वाहासाठी किराणा दुकान लावले आहे. या माध्यमातून आर्थिक अडचणीवर मात करणे सुरू केले.
कोट
इम्राम शेख, स्कूलबस चालक
व्यवसाय ठप्प, अडचणींचा सामना
कोरोना संकटामुळे प्रत्येकजण अडचणीत आले आहे. शाळेमध्ये स्वत:च्या मालकीची स्कूल बस चालवीत होतो. मात्र शाळा बंद झाल्यामुळे बसही बंद झाली. त्यामुळे सध्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
बाॅक्स
एकण स्कूल बस - ०००
१७०००
मुले दररोज स्कूलबसने प्रवास करायची
१०००
एकूण चालक