रस्त्यावरील पार्किंग हटविण्याची मागणी
चंद्रपूर : येथील गोलबाजार, जटपुरागेट, तुकूम परिसरामध्ये अनेक दुकाने आहेत, परंतु काही ग्राहक स्वत:ची वाहने पार्किंगमध्ये न ठेवता रस्त्यावरच लावतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. संबंधित विभागाने रस्त्यावरील पार्किंग हटवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
जडवाहतुकीला आळा घालावा
चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहे. या कामासाठी लागणारे साहित्य मोठ्या वाहनांद्वारे आणण्यात येत आहे. विशेष म्हणजे, काही रस्त्यांची क्षमता ही कमी असतानाही जास्त वजन असलेल्या वाहनांद्वारे साहित्य आणण्यात येत असल्याने रस्त्याची दुरवस्था आहे. परिणामी, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरी वसाहतीमध्ये जड वाहतुकीला आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
सुविधा उपलब्ध करून द्याव्या
चंद्रपूर : जिल्ह्यातील विविध गावांमध्ये आठवडा बाजार भरतो. या बाजाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असली, तरी बहुतांश बाजारामध्ये सोईसुविधा नसल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. या बाजारामध्ये किमान सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी करण्यात आली आहे.