शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

वरोऱ्यात शालेय मुलींची राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा शनिवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:04 PM

वरोऱ्यात प्रथमच १९ वर्षाखालील मुलींच्या ६४ व्या राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन दि. २९ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान लोकशिक्षण संस्थेच्या मैदानावर करण्यात आले आहे. सामने हे दि. ३० डिसेंबरला सकाळपासून घेण्यात येणार आहे. स्पर्धेत भारतातील ४४ मुलींचे संघ सहभागी होणार आहेत, अशी माहिती आमदार बाळू धानोरकर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देतयारी अंतिम टप्प्यात : देशातील ४४ संघ सहभागी होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वरोऱ्यात प्रथमच १९ वर्षाखालील मुलींच्या ६४ व्या राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन दि. २९ डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान लोकशिक्षण संस्थेच्या मैदानावर करण्यात आले आहे. सामने हे दि. ३० डिसेंबरला सकाळपासून घेण्यात येणार आहे. स्पर्धेत भारतातील ४४ मुलींचे संघ सहभागी होणार आहेत, अशी माहिती आमदार बाळू धानोरकर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.स्कूल गेम्स फेडरेशन आॅफ इंडिया, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा मल्टीपर्पज स्पोर्टस अ‍ॅन्ड व्हॉलीबॉल असोसिएशन व लोकशिक्षण संस्था वरोरा यांच्या संयुक्त ही राष्ट्रीय स्पर्धा होत आहे. स्पर्धेकरिता चार मैदाने तयार केली असून स्पर्धा सकाळी व रात्री विद्युत प्रकाश झोतात खेळविली जाणार आहे. स्पर्धकांच्या निवासाची व्यवस्था शहरातील विविध ठिकाणी करण्यात आहे. प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार आहे. राष्ट्रीय शालेय स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच रोख बक्षिसे दिले जाणार आहे हे विशेष. स्पर्धेची तयारी मागील काही दिवसांपासून जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे व अन्य विभागाचे अधिकारी तयारीवर लक्ष ठेवून आहे.बाळू धानोरकर यांनी केला आर्थिक अडथळा दूरशासनाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत ३ लाख रुपये उपलब्ध करून दिले. मात्र या निधीत ही स्पर्धा शक्य नसल्याने वरोरा-भद्रावती मतदार संघाचे आ. बाळू धानोरकर यांनी पुढाकार घेऊन आपल्या आमदार निधीतून ५ लाख रुपये उपलब्ध करून दिल्याने या स्पर्धेच्या आयोजनातील आर्थिक अडथळा दूर झाला आहे. वास्तविक, सर्व सोई-सुविधांचा विचार करता आयोजनाचा खर्च १४ लाखांच्या घरात जातो. उर्वरित निधीची तरतूद करण्याची ग्वाही आ. बाळू धानोरकर यांनी दिली असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांनी यावेळी दिली.