विद्यार्थ्यांचे नुुकसान : गावकऱ्यांनी ठोकले कुलूप, मुख्याध्यापकांची बदली करण्याची मागणीचिमूर : चिमूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या झरी (मंगरुळ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक सतत गैरहजर असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या मुख्याध्यापकांच्या बदलीच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी गुरुवारी शाळेला कुलूप ठोकले. आज चवथ्या दिवशीही सदर शाळा कुलूपबंदच असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.झरी येथे जिल्हा परिषदेची वर्ग १ ते ४ पर्यंतची शाळा आहे. या शाळेत १३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत दोन शिक्षकांपैकी पिसे हे मुख्याध्यापक म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. मात्र ते शाळेत नेहमी गैरहजर असतात.
चार दिवसांपासून शाळा कुलूपबंद
By admin | Published: October 10, 2016 12:37 AM