चंद्रपूर : मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. अशावेळी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय सुरू असला तरी अधिक वेळ मुले घरी राहत असल्याने घराघरांत आता मुले तसेच आईवडिलांमध्ये चिडचिडपणा वाढला आहे. विशेष म्हणजे, मुले शाळेत जात नसल्याने शिस्त कमी झाली असून वाट्टेल तसे राहण्याचा प्रयत्न करीत आहे. अशावेळी पालकांचा पारा चढत आहे.
कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे मुले आता घरच्या घरी राहत आहे. त्यांचा पूर्ण वेळ घरीच जात असल्यामुळे टीव्ही बघणे, मोबाईलवर खेळणे तसेच वाट्टेल तसे राहण्याचा प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे, मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे ते घरातील कामांकडे किंवा आई-वडिलांनी सांगितलेल्या छोट्या-छोट्या कामाकडेही दुर्लक्ष करीत आहे. दिवसभर टीव्ही बघण्यासह आपल्याच आवडीचे कार्यक्रम ते बघत असल्याने घराघरांत सध्या चिडचिडपणा वाढला आहे. अशावेळी पालकांनी मुलांना समजून घेत त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केल्यास दोघांचेही मानसिक आरोग्य चांगले राहून कोरोना संकटाच्या काळातही यातून मार्ग निघणे सहज शक्य आहे.
बाॅक्स
पालकांच्या समस्या
मुले दिवसभर घरी राहत आहे. त्यामुळे वाट्टेल तिथे घरातील कोणत्याही वस्तू ठेवतात. अनेकांच्या घरात नीटनेटकेपणा राहिलेला नाही. त्यामुळे आई-वडील मुलांना रागावतात. अशावेळी घरात रुसवे-फुगवे वाढले आहेत. टीव्हीवरील कार्यक्रम बघताना मुलांच्या पसंतीचेच कार्यक्रम बघावे लागत आहेत. ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये बहुतांश घरी मुले आई-वडिलांचाच मोबाईल वापरतात. कामाच्या वेळीच मुले मोबाईल घेऊन राहतात. शाळा नसल्याने अनेकांनी अभ्यास करणे सोडून दिले आहे. त्यामुळे पालकांना ताण वाढत आहे.
बाॅक्स
मुलांच्या समस्या
शाळा बंद आहे. त्यामुळे काही मुले ऑनलाईन अभ्यासक्रम करीत आहे. मात्र दिवसभर घरी राहून कंटाळले आहे. मोबाईल, टरव्ही एवढेच त्यांचे सध्या विश्व झाले आहे. त्यामुळे मुलांमध्येही चिडचिडेपणा वाढला आहे. बाहेर जाण्यावरही निर्बंध आले आहे.त काही घरी आई-वडील दोघेही कामावर जातात. अशावेळी दिवसभर त्यांना एकटे रहावे लागत आहे. यामुळे त्यांच्यामध्ये एकाकीपणा वाढला आहे. तर माध्यमिक तसेच वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाची चिंता सतावत आहे.
डाॅक्टर म्हणतात....
मुलांना बाहेर जाण्यावर त्यांच्या आवडी-निवडीवर निर्बंध आले आहे. मित्र -मैत्रिणीसोबत खेळणे बालकांना आवडतात. सध्या ते स्वतंत्र खेळू शकत नाही. त्यांच्या आवडी पालकांनी समजून घेणे सध्या अत्यंत गरजेचे आहे. त्यांना मोबाईल आणि टीव्ही यातून मुक्तता हवी आहे. मुलांच्या मनासारखे होत नसल्याने ते चिडचिडपणा करतात. मुलांच्या आवडी-निवडी ओळखून त्यांना अधिकाधिक आनंदी ठेवण्याचा प्रयत्न पालकांनी करावा. म्हणजे पालक आणि मुलांना दोघांनाही समाधान मिळेल.
-डाॅ. गोपाल मुंधडा
बालरोगतज्ज्ञ, चंद्रपूर