वैशाली येसांबरे : नेरी येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनपेंढरी (कोके) : शोधवृत्तीतूनच एखाद्या वस्तुचा शोध लागतो. तिचा विकास करा, विज्ञान विषयी जनजागृती करा. एखाद्या खेड्यातूनच वैज्ञानिक निर्माण व्हावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन चिमूर पं.स.च्या सभापती वैशाली येसांबरे यांनी केले. चिमूर तालुका विज्ञान प्रदर्शनाच्या नेरी येथील लोक विद्यालयात उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युग प्रवर्तक सेवा मंडळ नेरीचे अध्यक्ष अरुण तुम्पल्लीवार होते. मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. वासंती रेवतकर, संस्थेचे उपाध्यक्ष कमलाकर लोणकर, बीडीओ एस. आर. कांगणे, जि.प. सदस्य अल्का लोणकर, गीता नन्नावरे, सरपंच दिक्षा भैसारे, गोपाळराव पिसे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरुण पिसे, गटशिक्षणाधिकारी प्रदीप उपलंचिवार, शिक्षण विस्तार अधिकारी एस. व्ही. तेलकापल्लीवार, किशोर पिसे, जी. एल. चांदेकर, उषा जवादे, मुख्याध्यापक गुरुदास बोरकर, दारुजी खोब्रागडे, संदीप पिसे आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्य मार्गदर्शक वासंती रेवतकर यांनी मोबाईल, इंटरनेट, फेसबूक, व्हॉटसअप यांचे फायदे -तोटे सांगितले. अध्यक्षीय भाषणातून तुम्पलीवार यांनी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टी जोपासावी, असे सांगितले. प्रास्ताविक प्रदीप उपलंचीवार यांनी केले. संचालन वि. जा. रणदिवे तर आभार पर्यवेक्षक विजय कोंकमवार यांनी मानले. यावेळी बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)
खेड्यातून वैज्ञानिक निर्माण व्हावा
By admin | Published: November 27, 2014 11:32 PM