लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील मौजा इटोली येथील लताबाई गोपाळ देवतळे यांच्या घरी कुत्र्याच्या शोधात बिबट्याने घरात प्रवेश केला. यामुळे देवतळे कुटुंबीय व शेजाऱ्यांमध्ये एकच तारांबळ उडाली. सदर घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली.बिबट्या घरात शिरताच देवतळे यांनी बाहेर येऊन घराचे दार लावून घेतले. त्यामुळे बिबट्यास बाहेर निघता येत नव्हते. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. माहिती मिळताच बल्लारपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, क्षेत्र सहाय्यक प्रवीण विरूटकर यांनी घटनास्थळी पोहचून जमाव बाजूला केला.त्यानंतर वनरक्षक कवासे, पोडचलवार, रामटेके, जुमडे व पोलिसांनी जवळच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी नेले. बिबट्याला जंगलाच्या दिशेने पळविण्याकरिता गावाच्या दिशेने जाळी लावून गावाकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला.त्यानंतर फटाके फोडून घराचे दार उघडण्यात आले. दार उघडताच बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.
शिकारीच्या शोधात बिबट्या शिरला घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:24 AM
बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील मौजा इटोली येथील लताबाई गोपाळ देवतळे यांच्या घरी कुत्र्याच्या शोधात बिबट्याने घरात प्रवेश केला. यामुळे देवतळे कुटुंबीय व शेजाऱ्यांमध्ये एकच तारांबळ उडाली. सदर घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली.
ठळक मुद्देइटोली येथील घटना : फटाके फोडून बिबट्याला पळविले