शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

‘त्या’ वाघाचा शोध सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 9:34 PM

मागील पाच दिवसांपासून झुडूपात बस्तान मांडून बसलेल्या पट्टेदार वाघाची भद्रावतीकरांच्या मनात भीती आहे. पण त्याला पाहण्याची उत्सुकताही आहे. त्यामुळे घटनास्थळावर बालकांपासून तर वृद्धांपर्यंत सारेच गर्दी करीत आहेत.

ठळक मुद्देवन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न : वाघ बघण्यासाठी नागरिकांचा आटापिटा

सचिन सरपटवार।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : मागील पाच दिवसांपासून झुडूपात बस्तान मांडून बसलेल्या पट्टेदार वाघाची भद्रावतीकरांच्या मनात भीती आहे. पण त्याला पाहण्याची उत्सुकताही आहे. त्यामुळे घटनास्थळावर बालकांपासून तर वृद्धांपर्यंत सारेच गर्दी करीत आहेत. कुणी भिंतीवर, कुणी घराच्या स्लॅबवर अथवा चक्क झाडांवर चढून वाघाला पाहण्यासाठी धडपडत आहेत. अनेकांनी वाघाच्या विविध मुद्रा मोबाईलमध्ये टिपण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे नागरिकांना हैराण करणाऱ्या वाघाला जंगलात हाकलण्यासाठी वनविभागाचे पथक आटापिटा करीत आहेत.वनविभागाकडून हाकलून दिल्यावरही वाघ पुन्हा त्याच ठिकाणी येवून बस्तान मांडत आहे. त्यामुळे या वाघाने शहरातील नागरिकांची झोप उडविली आहे. दोन हेक्टर परिसरात वास्तव्यास असलेल्या हा वाघ सुरक्षित जागेच्या शोधात आहे. आयुध निर्माणी येथील पिनाका प्रकल्पाच्या दिशेने जावून पुन्हा पण परत येतो. गौतमनगर परिसरातील झुडूपांमध्ये गावठी डूकरे मोठ्या संख्येने आहेत. परिणामी वाघाचा या परिसरात मुक्काम वाढत असावा, अशी चर्चा आहे. वनविभागाच्या पथकाने वाघाला हाकलून लावण्यासाठी रात्रभर गस्त घालत आहे. वाघाच्या प्रत्येक हालचालीवर वनविभाग लक्ष ठेवून आहे. हा वाघ ताडाळी येथून सारवाही परिसरात आला होता. दरम्यान म्हातारदेवीच्या दिशेने गेला. सारवाही परिसरातून धारिवाल कंपनीची सुरक्षा भिंत, कोंढाळी तलाव, रेल्वे ट्रॅकमार्गे इंजिनिअरिंग कॉलेज जवळील नाल्याजवळ पुलाच्या सहाय्याने मोहबळा शेतात आला. तिथून पुन्हा आयुध निर्माणी परिसरात पोहोचल्याचे काही नागरिक सांगतात. तेव्हापासून हा वाघ या भागात बस्तान मांडून आहे. वन विभागाने शर्थीचे प्रयत्न करूनही जंगलात हाकलून लावण्यास अपयश आले. दरम्यान, हा वाघ बघण्यासाठी नागरिक आटापिटा करीत आहेत.वाघाच्या दहशतीमुळे आयुध निर्माणीने मार्ग बदलविलावाघाल जंगलात हाकलून लावण्यासाठी वन विभागाच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न सुरू केले. पण अजुनही यश आले नाही. परिणामी, शोध मोहिमेत वारंवार अडचणी येत आहेत. दरम्यान, हा वाघ बघण्यासाठी रविवारीदेखील नागरिकांनी रस्त्यावर मोठी गर्दी केली होती. आयुध निर्माणीच्या मार्गावरून नागरिकांची मोठी वर्दळ असते. परंतु वाघाच्या दहशतीमुळे व्यवस्थापाने या मार्गात बदल केला आहे. मुख्य प्रवेशद्वारापासून पायी किंवा वाहनाने जाण्यासाठी प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.