कोरोनाची दुसरी लाट पाहिल्या लाटेपेक्षा भयावह होती. या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला. काहींनी तर बेड उपलब्ध झाले नसल्याने तडफडत रस्त्यावर प्राण सोडला. याचा परिणाम साहजिकच आप्तस्वकीयांवर झाला. त्यातच लॉकडाऊन असल्याने आवश्यक कामासाठी बाहेर पडण्याची परवानगी होती. सर्व दुकाने बंद असल्याने अनेकांना मोठा आर्थिक फटका बसला. कौटुंबिक तणाव वाढले. कोरोना झालेल्याला अनेकजण दुरावत होते. बहतुेक रुग्णांना तर कुटुंबीयांकडून वेगळी वागणूक देण्यात येत होती. विलगीकरणात असलेल्यांना एकटेपणा जाणवत होता. त्यामुळे अनेकजण डिप्रेशनमध्ये जात आहेत. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत डिप्रेशनचे प्रमाण वाढत आहे. मानसिक आजारातून वेळीच बाहेर पडण्यासाठी समुपदेशन महत्वपूर्ण ठरते. त्यामुळे अशा रुग्णांनी वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे.
बॉक्स
डिप्रेशन टाळण्यासाठी काय कराल?
-कोरोनासारख्या महामारीत काही वेळेस उदास वाटणे, चिंता करणे, चिडचिडपणा होणे, या गोष्टी स्वाभाविक आहेत. त्याचा स्वीकार करावा.
-महामारी जेव्हा येते. तेव्हा आपण नेहमीसारखे वर्तन करू शकत नाही. आपल्याला काही बंधने पाळावी लागतात. याचा स्वीकार करावा म्हणजे होणारी चिडचीड, ताण कमी होतो.
-महामारी येते आणि जाते. त्यामुळे हेही दिवस जातील हा विश्वास ठेवावा.
-शरीरावरील व मनावरील ताण कमी करण्यासाठी रिलॅक्सेशन थेरपी, ध्यान, विपश्यना करावी.
-सतत उदास, नाराज वाटत असेल, मन सतत चिंताग्रस्त असेल, झोप येत नसेल तर मानसोपचार तज्ज्ञाची मदत घ्यावी.
बॉक्स
डिप्रेशन का वाढले?
-कोरोनाने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांचे व्यवसाय बंद असल्याने मोठा आर्थिक फटका बसला.
-दुसऱ्या लाटेत मृतांची आकडेवारी बघून आपणाला व आपल्या कुटुंबातील व्यक्तीला कोरोना झाला तर उपचार मिळेल की नाही, याचा सतत विचार करणे.
-आर्थिक समस्या भेडसावल्याने कोटुंबिक तणाव वाढले.
----------
--------
कोट
दुसऱ्या लाटेत रुग्ण वाढले
कोरोनाच्या दोन्ही लाटेत नैराश्य, चिंतारोग, झोपेचे विकार यासारखे मानसिक आजार वाढले. पण दुसऱ्या लाटेत याची तीव्रता अधिक आहे. दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण अधिक होते. जवळपास प्रत्येकांच्या घरात किंवा परिचयातील व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली. रुग्णालयात बेड्स मिळत नव्हते. स्मशानभूमीवर पहिल्यादांच रांगा लागल्या होत्या. या सगळ्याचा एकत्रित परिणाम लोकांच्या मानसिकतेवर झाला. तर अनेकजण बेरोजगार झाले. त्यामुळे त्यांच्यात नैराश्य निर्माण झाले. अशा रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु, झोप न येणे, सतत विचार येणे, उदास वाटणे, चिडचिडपणा वाढणे अशी लक्षणे जाणवत असल्यास मानसोपचार रोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
डॉ. विवेक बांबोळे, मानसिक रोग तज्ज्ञ, चंद्रपूर
कोट
कोरोनाच्या उपचारादरम्यान गरजेपेक्षा औषधाचा मारा अधिक झाला असल्याने ब्लॅक फंगल्स यासारखे अनेक आजार वाढले. त्याच्या औषधाची मागणी वाढली आहे. परंतु, त्याचा पुरवठा पाहिजे त्या प्रमाणात होत नाही.
मुकुंद दुबे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशन
-