चंद्रपूर : ५ एप्रिल रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा केंद्राच्या परिसरात येथील जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कलम १४४ लागू केली आहे. त्या अनुषंगाने परीक्षा केंद्राच्या परिसरात दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती समुहास एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.सदर परीक्षा केंद्राच्या १०० मीटर क्षेत्रांतर्गत नियमित व रोजचे वाहतुकीव्यतिरिक्त इतर हालचालींना प्रतिबंध राहील. उपरोक्त कालावधित परीक्षा दिनी परीक्षा केंद्राच्या १०० मिटर क्षेत्राअंतर्गत झेरॉक्स, फॅक्स, ई-मेल, मोबाईल फोन आणि इंटरनेट सवलती किंवा अन्य कोणतेही कम्युनिकेशन सवलतीवर प्रतिबंध राहील. सदर आदेश सरदार पटेल महाविद्यालय गंज वार्ड चंद्रपूर, जनता हायस्कूल जवळ डॉ. वासलवार हॉस्पीटल चंद्रपूर, भवानजीभाई चव्हाण हायस्कूल मूल रोड चंद्रपूर, डॉ. आंबेडकर कॉलेज आॅफ आर्टस कॉमर्स अॅन्ड सायन्स नागपूर रोड चंद्रपूर, सेंट मायकल इंग्लिश स्कुल नगिनाबाग चंद्रपूर, विद्याविहार कॉन्व्हेंट हायस्कूल अॅन्ड ज्युनियर सायन्स कॉलेज तुकुम चंद्रपूर, मुरलीधर बागला कॉन्व्हेंट हायस्कुल बाबुपेठ चंद्रपूर, रफी अहमद किदवाई मेमोरियम हायस्कुल अन्ड ज्युनियर कॉलेज घुटकाळा वार्ड चंद्रपूर या ठिकाणी लागू राहील.या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती व इसम वा समुह प्रचलित कायदेशीर तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकातून कळविले आहे. (प्रतिनिधी)
राज्यसेवा पूर्व परीक्षा केंद्र परिसरात १४४ कलम लागू
By admin | Published: April 05, 2015 1:32 AM