बियाणे कायदा १९६६ अनुसार, कोणतेही बियाणे विकताना शेतकऱ्यांकडून हमीपत्र भरून घेण्यास मनाई आहे. मात्र काही विक्रेते अशा प्रकारचे हमीपत्र भरून घेण्यास शेतकऱ्यांना तगादा लावत असल्याची माहिती. ७० टक्क्यांपेक्षा कमी उगवण क्षमता असणारे बियाणे विकता येत नाही. जादा नफा मिळविण्याच्या हव्यासात विक्रेते काही कंपन्यांकडून बियाणे खरेदी करतात. शेतकऱ्यांना हे बियाणे विकताना हमीपत्र भरून घेण्याचा आग्रह करीत आहेत. यासंदर्भात शेतकऱ्यांनी तक्रार केली नाही. पण, विशेषत: सोयाबीन बियाणे बाजारपेठ संशयाच्या भोवऱ्यात आहे. कृषी विभागाने विक्रेत्यांची चौकशी करून कारवाई केली पाहिजे.
हॅलो एक बातमीसाठी बॉक्स
बियाणांबाबत व्हॉट्स अॅपवर करता येणार तक्रार
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. मान्सूनचे आगमन झाल्यास कृषी निविष्ठा खरेदीसाठी बाजारात वर्दळ वाढेल. अशावेळी विक्रेते शेतकऱ्यांकडून जादा रकम वसूल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कृषी आयुक्तांच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना तक्रारी करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. कृषी निविष्ठांसाठी जादा रक्कम घेतल्यास शेतकऱ्यांनी व्हॉट्स अॅपवर व कृषी विभागाच्या ई-मेलवर पुराव्यांसह तक्रारी करता येणार आहेत.