शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

आठ लाखांच्या भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2016 12:42 AM

गेल्या साडेतीन वर्षांपासून नांदा येथील अंगणवाडी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली वारंवार अपात्रतेच्या कार्यवाही सापडलेल्या ...

नांदा येथील अंगणवाडीचे बांधकाम: सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या संगनमतातून गैरप्रकार चंद्रपूर : गेल्या साडेतीन वर्षांपासून नांदा येथील अंगणवाडी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली वारंवार अपात्रतेच्या कार्यवाही सापडलेल्या सरपंच पूजा मडावी, तत्कालिन ग्रामविकास अधिकारी रामभाऊ बोपनवार व तत्कालिन ग्रामविकास अधिकारी भडके यांच्याकडून सात लाख ८६ हजार १९५ रुपये वसूल करून तिघांवरही फौजदारी गुन्हा दाखल करणे योग्य होईल, असा अभिप्राय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी चौकशी अहवालात दिला आहे.असे असले तरी हात दिवस उलटूनही जिल्हा परीषद प्रशासनाने फौजदारी गुन्हा दाखल न केल्याने प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील व डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी ३९/१ ची कारवाई नियमानुसार न केल्याने राज्यमंत्र्याच्या अपात्रतेच्या आदेशाला नागपूर उच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढून नव्याने चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तब्बल साडेतीन वर्षे भ्रष्टाचाराविरुद्ध लढत असताना सरपंचपदाचा कार्यकाळ संपत आला तरी जनतेच्या लाखो रुपयांचा हिशेब जनतेला मिळाला नाही. भ्रष्टाचार सिद्ध झाला असताना अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घातले असल्याचा आरोप तक्रारकर्ते हारून सिद्दिकी यांनी केला आहे.अंगणवाडी बांधकामासाठी वितरीत करण्यात आलेल्या निधीपैकी अफरातफर करण्यात आलेल्या रकमेपैकी सरपंच पूजा ज्ञानेश्वर मडावी यांच्याकडून तीन लाख ९३ हजार ९७ रुपये, तत्कालिन ग्रामविकास अधिकारी रामभाऊ बोपनवार यांच्याकडून एक लाख ६३ हजार ५५६ व तत्कालिन ग्रामविकास अधिकारी भडके यांच्याकडून २ लाख २९ हजार ५४२ अशी एकूण ७ लाख ८६ हजार १९५ रुपये वसूल करण्यात येणार आहे. तसेच तत्कालिन ग्रामविकास अधिकारी रामभाऊ बोपनवार व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी भडके यांची विभागीय चौकशी करून प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचे चौकशी अभिप्रायात म्हटले आहे. यामुळे संबंधित पदाधिकारी व ग्रामसेवकांवर कारवाई होण्याची शक्यता बळावत असली तरी प्रशासकीय पातळीवर मात्र कारवाईसाठी चालढकल केली जात असल्याने गावकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)१० जूनला मुंडण आंदोलनलहान मुलांसाठी अंगणवाडीचे तब्बल आठ लाख रुपये घशात घालून बालकांच्या हक्काची शाळा हिरावून घेणाऱ्या सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी नांदा ग्रामवासियांवर अन्याय केला आहे. सतत साडेतीन वर्षांपासून भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवता-उठवता सरपंचपदाचा कार्यकाल संपला तरी कारवाई न झाल्याने दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा व भ्रष्टाचार करून हडलेल्या निधीची वसुली करावी, अंगणवाड्यांचे उर्वरित बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी येत्या १० जूनला जिल्हा परिषदेसमोर नांदा गावातील नागरिक मुंडण आंदोलन करणार असल्याबाबत निवेदन दिल्याचे तक्रारकर्ते हारून सिद्दिकी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.राजकीय दबावातून कारवाईसदर चौकशी ही राजकीय दबावातून करण्यात आली असून मी कोणताही भ्रष्टाचार केला नाही. निवडणुकीच्या तोंडावर मला फसविण्याचा प्रयत्न होत आहे. -पूजा मडावी, सरपंच, नांदा