लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : सध्या शेतीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आल्याने दुकानदार बि-बियाणांची साठवणूक करीत आहे. अशातच महाराष्ट्र शासनाची बंदी असलेल्या कपाशीच्या चोर बिटी बियाण्यांची आयात राजुरा तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात होत असल्याची माहिती लक्कडकोट टोल नाक्याजवळ गस्तीत असलेल्या निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांना मिळाली. चौकीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी बियाण्यांनी भरलेला ट्रक थांबवून त्याची तपासणी केली असता त्यात कपाशीचे चोर बिटी बियाणे आढळून आले. याची माहिती लगेच कृषी विभागाला देण्यात आली. कृषी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन ट्रकवर कारवाई करून ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी ट्रक चालक मुख्तार बेग मुबारक बेग (२४) यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.ट्रक चालकाच्या सांगण्याप्रमाणे आसिफाबाद येथून ट्रक घेऊन येत असताना तीन लोकांनी त्याला मुरमुºयाचे पोते मूल येथे न्यायचे आहे असे सांगून दहा हजार रूपये किराया मान्य करून सदर माल आयसर ट्रक क्र. एमएच ४९९२७१ यात भरून लक्कडकोट येथील आरटिओ नाक्यावर पावती न घेता १०० रूपये देऊन समोर आला. दरम्यान, निवडणूक विभागाचे कर्मचारी तिथे गस्तीवर होते. त्यांनी ट्रकमधील मालाची चौकशी केली असता त्यात बोगस बिटी बियाण्यांचे १९५० पॉकीट आढळून आले. पॅकिंग मशिन व वजनकाटा असा एकूण ५५ लाख रूपये किंमतीचा माल जप्त केला असून पुढील कारवाई राजुरा पोलीस करीत आहे. कारवाई करताना जिल्हा कृषी अधिकारी उदय पाटील, जे. डी. मोरे, नरेंद्र धोंगडे, मधुकर सोनटक्के उपस्थित होते.
५५ लाखांचे चोर बीटी बियाणे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 10:21 PM
सध्या शेतीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आल्याने दुकानदार बि-बियाणांची साठवणूक करीत आहे. अशातच महाराष्ट्र शासनाची बंदी असलेल्या कपाशीच्या चोर बिटी बियाण्यांची आयात राजुरा तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात होत असल्याची माहिती लक्कडकोट टोल नाक्याजवळ गस्तीत असलेल्या निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांना मिळाली.
ठळक मुद्देकृषी विभागाची कारवाई : तेलंगणातून येत होता माल