नागपूर-चंद्रपूर महामार्गावरून वरोरा शहराकडे भरलेले टिप्पर व ट्रॅक्टर एकामागे एक येत होते. दरम्यान, दुभाजकावर शासकीय वाहन वळण घेत असल्याचे वाहनचालकाला दिसले. शासकीय अधिकारी आपला ट्रॅक्टर पकडतील या भीतीने चालकाने मालकाला टिप्पर पकडल्याची माहिती भ्रमणध्वनीवरून दिली. लगबगीने मालक दुचाकीवरून घटनास्थळावर पोहोचले. दरम्यान, त्यांना भोवळ आल्याने ते खाली पडले. यावेळी मोठी गर्दी जमा झाली. दरम्यान टिप्पर पसार झाला; परंतु, रेती भरलेला ट्रॅक्टर तेथेच होता. अनेकांनी या घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याच्या परवान्यांची तपासणी केली. तो जुना असल्याचे समोर आले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर जप्त केले. जर येथे गर्दी जमा झाली नसती तर कारवाई केली नसती की काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
रेती भरलेला ट्रॅक्टर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:30 AM