ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मुदतीत पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी करून प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. सोडतीच्या माध्यमातून प्रवेश मिळूनही पडताळणी समितीशी संपर्क न साधणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला जाणार आहे.
१ हजार ५७१ जागांसाठी ही निवड करण्यात आली आहे. ज्या पालकांना एसएमएस आले आहेत अशाच विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेश निश्चिती करावयाची असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या कालावधीत पडताळणी समितीकडून कागदपत्रांची तपासणी करावी लागणार आहे. पालक बाहेरगावी असतील तर समितीशी ई-मेलद्वारे किंवा व्हॅाटस् ॲपच्या माध्यमातून संपर्क साधावा लागणार आहे. प्रवेश मिळूनही समितीशी संपर्क न साधणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द कला जाणार आहे. एकापेक्षा अधिक प्रवेश अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश लाॅटरीतून प्रवेश मिळाला तरीही रद्द करण्यात येणार आहे.