सेवाग्राम वैद्यकीय महाविद्यालय, सेवाग्राम, लायन्स क्लब चंद्रपूर आणि जि. प.सदस्य रमाकांत लोधे यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सेवाग्राम नेत्र रुग्णालय येथील डॉ. अझहर, डॉ.गौरव आणि नेत्र सहायक कार्डेकर तसेच ग्रामीण रुग्णालय, सिंदेवाही येथील नेत्र सहायक दुधे व सेवानिवृत्त नेत्र चिकित्सक जाधव यांनी रुग्णांची नेत्र तपासणी केली आणि निवडलेल्या ७४ रुग्णांना शस्त्रक्रियेकरिता सेवाग्राम नेत्र रुग्णालय सेवाग्राम येथे रवानगी करण्यात आली. यशस्वीतेकरिता ग्रा.पं. सदस्य मंगेश मेश्राम, वामन जीवतोडे, ग्रा. पं. सदस्य वासुदेव दडमल, कपिल मेश्राम, शिक्षक दिनकर गायकवाड, टिकेश कुंभरे, आशिष पात्रे, आशिष नागोसे, सुरज कुंभरे, वैभव चनफने, सचिन ढोणे यांनी विशेष मेहनत घेतली.
270821\img-20210825-wa0000.jpg
रुग्णांना गाडीमध्ये बसवुन रवाना करतांना डाॅक्टर आणि मान्यवर