लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती: स्वयंरोजगार करण्यासाठी बँकेकडून आर्थिक मदत दिल्या जात आहे. त्यामुळे बेरोजगारीवर मात करण्यासाठी स्वयंरोजगाराचा पर्याय स्वीकारा, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले़ भाजपा भद्रावतीतर्फे संत गोरोबाकाका समाजमंदिर कुंभार वॉर्डात पार पडलेल्या भाऊबीज सोहळ्यात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ तालुका अध्यक्ष बेलुजी खापनवाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष अहतेशाम अली़ भाजपा जिल्हा सचिव राहुल सराफ, किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, शहराध्यक्ष प्रवीण सातपुते, दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय वानखेडे, शहर भाजपा महामंत्री प्रशांत डाखरे, शहर भाजपा महामंत्री किशोर गोवारदिपे, माजी नगराध्यक्ष सुनिल नामोजवार, सामाजिक कार्यकर्ते विजशाल बोरकर, अमित गुंडावार, बाळु अपलंचीवार, शंकर पांडे, प्रणिती शेंडे आदी उपस्थित होते़भगिनींनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना ओवळणी घातली.ना. अहीर म्हणाले, स्वयंरोजगार देण्यासाठी अथवा कर्जासाठी बँक अर्थसहाय्य देण्यास टाळाटाळ करीत असेल तर संपर्क साधा़वा. बहिण-भावांसाठी सर्वात मोठा सण म्हणजे भाऊबीज होय.आजच्या दिवस आत्मीयता जागृत करणारा हा भावनिक कार्यक्रम आहे़ भारताच्या चालीरिती परंपरा सुरू ठेवण्यासाठी असे कार्यक्रम गरजेचे आहे, असेही ना. अहीर यावेळी म्हणाले. या प्रसंगी कुंभार समाजातील बेलुजी खापनवाडे गणपत ठाकरे, विठोबा पाठक, कवडू वाणी, शंकर बोरसरे, आनंद व्यवहारे, पार्वता वाणी, मैना खापनवाडे, चिरकुट वाणी, सदूजी वाणी यांचा ना़ अहिर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला़ नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी मार्गदर्शन केले़ अन्य मान्यवरांनीही विचार मांडले. संचालन सुनिल नामोजवार, प्रास्ताविक प्रविण सातपुते यांनी केले. आभार किशोर गोवारदिपे यांनी मानले़
स्वयंरोजगारातून बेरोजगारीवर मात करणे शक्य -हंसराज अहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 10:54 PM