लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : ‘रक्षाबंधन’ अर्थात राखी भाऊ-बहिणीच्या जिव्हाळ्याचा सण. औक्षण करून बहीण भावाच्या हातावर राखी बांधते. आपुलकी व पे्रेमाच्या धाग्यातून रक्षणाची जबाबदारी मागते. हळव्या मनातील साद, प्रेमाचा ओलावा निर्माण करणारा राखी सण. या सणाला पर्यावरणपूरक करण्याचा संकल्प आदिवासी महिला बचत गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. बांबूपासून तयार केलेल्या राखीला महिलांनी पसंती दिली. यामुळे ‘रेशीमगाठी’ व्यवसायातून महिलांनी आत्मनिर्भरतेचा मार्ग शोधला आहे.महाराष्टÑ बांबू विकास मंडळ, बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली व महिला आर्थिक विकास महामंडळ चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यामाने आदिवासी महिला बचत गटांना आत्मनिर्भर करण्याचा संकल्प केला. यासाठी राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठे योगदान दिले. त्यांच्याच कल्पकतेतून ‘रेशीमगाठी’ व्यवसायासाठी महिला पुढे आल्या. याचा प्रत्यय शुक्रवारी येथील प्रशासकीस भवनाच्या प्रवेशव्दारासमोर लावण्यात आलेल्या राखी स्टॉलवरून दिसून आला. बांबुपासून तयार केलेल्या पर्यावरणपुरक राख्या आकर्षक, कलात्मक व अप्रतिम असल्याने महिलांच्या पसंतीला चांगल्याच उतरल्या आहे.राखी सण एक दिवसावर येऊन ठेपला आहे. ‘रेशीमगाठी’ भाऊरायाच्या हातावर बांधून दीपज्योतीने औक्षण करण्यासाठी बहीण आतूर झाली आहे. अशातच पोंभूर्णा येथील रोहणी नैताम व हर्षा कामडवार या बचत गटांच्या महिलांनी येथील तहसील कार्यालय परिसरात स्टॉल लावला. उपविभागीय अधिकारी क्रांती डांबे व तहसीलदार विकास अहीर यांनी प्रोत्साहन दिले. शेकडो महिला बचत गट चिचपल्ली येथील बांबु संशोधन प्रशिक्षण केंद्रात बांबु कलेचे प्रशिक्षण घेत आहेत. विविध वस्तु साकारत आहेत.राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुगनंटीवार यांच्या प्रयत्नामुळे पोंभुर्णा येथील प्रशिक्षण केंद्रात बांबुपासुन राख्या तयार केल्या. राखी विक्रीचे पहिलेच वर्ष आहे. बांबुपासून विविध वस्तू तयार केले जात आहेत. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी व आत्मोन्नती साधण्यासाठी रोजगाराचे दालन मिळल्याचा आनंद आहे.- रोहिणी नैताम,राखी विक्रेती,आदिवासी महिला बचत गट पोंभूर्णा
रेशीमगाठी व्यवसायातून महिला झाल्या आत्मनिर्भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 10:58 PM
‘रक्षाबंधन’ अर्थात राखी भाऊ-बहिणीच्या जिव्हाळ्याचा सण. औक्षण करून बहीण भावाच्या हातावर राखी बांधते. आपुलकी व पे्रेमाच्या धाग्यातून रक्षणाची जबाबदारी मागते. हळव्या मनातील साद, प्रेमाचा ओलावा निर्माण करणारा राखी सण. या सणाला पर्यावरणपूरक करण्याचा संकल्प आदिवासी महिला बचत गटाच्या कार्यकर्त्यांनी केला
ठळक मुद्देआदिवासी बचत गटाचा उपक्रम : वनमंत्र्यांचे योगदान, बांबुराखीला मागणी