लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्मार्ट फोनच्या वापरामुळे गेल्या तीन वर्षात सेल्फीची नवीन पद्धत जनमानसात रुढ झाली आहे. चांदा कल्ब ग्राऊंडवर सुरू असलेल्या सरस महोत्सवात स्वच्छ भारत मिशनच्या जनजागृतीकरिता सेल्फी विथ अमिताभ बच्चन हा सेल्फी पॉर्इंट महोत्सवाचे आकर्षण ठरला आहे.खेड्यापासून शहरापर्यंत आज सर्वच क्षेत्रातील मंडळी स्मार्ट फोनचा वापर करतात. यामुळे सेल्फीची क्रेझ दिवसागनिक वाढत चालली आहे. सेल्फी पॉर्इंटचा जहिरात क्षेत्रात वापर केला जात आहे. याच प्रकारे चंद्रपूरच्या चांदा कल्ब ग्राऊंडमध्ये ११ जानेवारी ते १५ जानेवारी २०१९ या कालावधीत महिला बचत गटांच्या उत्पादित मालाच्या विक्रीकरिता सरस महोत्सवाचे आयोजन केलेले आहे. या महोत्सवास दररोज जिल्ह्यातील हजारो नागरिक भेट देत असून महोत्सवात येणारा प्रत्येक व्यक्ती स्वच्छ भारत मिशनच्या जनजागृतीकरिता उभारलेल्या सेल्फीविथ अमिताभ बच्चन या सेल्फी पाईटला भेट देऊन अभिनयाचा बादशहा अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या प्रतिकृतीसोबत सेल्फी फोटो काढण्याचा मनमुराद आंनद घेत आहे. महोत्सवात येणारे छोट्यापासून तर मोठे मंडळीसुध्दा या सेल्फी पॉर्इंटचा आनंद घेत आहे. सेल्फी पॉर्इंट स्वच्छ भारत मिशनच्या व्यापक जनजागृतीकरिता उभारला असून याद्वारा महोत्सावात येणाऱ्या ग्रामस्थांमध्ये शाश्वत स्वच्छतेचा संदेश देण्याचे काम केले जात आहे.सीईओंची संकल्पनाया महोत्सवात स्वच्छ भारत मिशनच्या प्रचार प्रसिध्दीचा अनोखा व लोकांना आकर्षण ठरेल, असा अभिनव उपक्रम सेल्फी पॉर्इंट असावा, ही संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सूचवली. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) ओमप्रकाश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेच्या जनजागृतीचा मजेदार सेल्फी पॉर्इंट तयार करण्यात आला आहे. सरस महोत्सवात येणारा प्रत्येकजण सेल्फीविथ अमिताभ बच्चन या सेल्फी पॉर्इंटचा मनमुराद आनंद घेत आहे.स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या जनजागृतीसाठी सेल्फी पॉर्इंट सरस महोत्सवात उभारला असून महिला बचत गटांच्या वस्तु खरेदीसह ‘सेल्फीविथ अमिताभ बच्चन’ आस्वाद घेत असल्यामुळे शाश्वत स्वच्छतेचा संदेश लोकांपर्यंत पोहचण्यास या सेल्फी पॉर्इंटची मदत झाली आहे. महोत्सवाच आकर्षण सेल्फी पॉईट ठरत आहे.- जितेंद्र पापळकर,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, चंद्रपूर.
सरस महोत्सवात सेल्फी विथ अमिताभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 10:22 PM
स्मार्ट फोनच्या वापरामुळे गेल्या तीन वर्षात सेल्फीची नवीन पद्धत जनमानसात रुढ झाली आहे. चांदा कल्ब ग्राऊंडवर सुरू असलेल्या सरस महोत्सवात स्वच्छ भारत मिशनच्या जनजागृतीकरिता सेल्फी विथ अमिताभ बच्चन हा सेल्फी पॉर्इंट महोत्सवाचे आकर्षण ठरला आहे.
ठळक मुद्देस्वच्छ भारत मिशन : जनजागृतीचा अभिनव उपक्रम