शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कापसाची कवडीमोल भावात विक्री

By admin | Published: October 24, 2015 12:26 AM

जिल्ह्यातील वरोरा, कोरपना, राजुरा, भद्रावती, जिवती आदी तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

शासकीय खरेदीला प्रारंभ नाही : तेलंगणा आणि यवतमाळ जिल्ह्यात जातोय कापूस विक्रीलाचंद्रपूर : जिल्ह्यातील वरोरा, कोरपना, राजुरा, भद्रावती, जिवती आदी तालुक्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यावर्षी साधारणत: सव्वा लाख हेक्टरवर कापसाचा पेरा आहे. सध्या सर्वत्र कापूस वेचणीला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांच्या घरी कापसाची आवक सुरू झाली आहे. मात्र शासनाने अद्यापही कापूस खरेदीला प्रारंभ केला नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीमधून खासगी व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदी होत आहे. मात्र या ठिकाणी कवडीमोल भावात शेतकऱ्यांना कापूस विकावा लागत आहे. यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ ५० रुपयेच हमीभाव वाढवून शासनाने जाहीर केल्याने शेतकऱ्यांच्या अच्छे दिनाची निराशा झाल्याचे शेतकरी सांगतात. कापसाचा उत्पादन खर्च जवळपास ६८०० रुपयाहून अधिक असून प्रति क्विंटल ४ हजार १०० रुपये हमीभाव शासनाने जाहीर केला आहे. या भावात उत्पादन खर्चही भरून निघत नाही. सध्या जिल्ह्यात वरोरा व माढेळी या ठिकाणी खासगी व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी सुरू केली आहे. कोरपना तालुक्यात एकमेव कापूस संकलन केंद्र कोरपना येथे असून अद्यापही केंद्राचे उद्घाटन झालेले नाही. वरोरा व माढेळी या ठिकाणी कापसाला जो भाव दिला जात आहे, तो शेतकऱ्याला आर्थिक अडचणीत टाकणारा आहे. त्यामुळे आर्थिक चणचण असलेले शेतकरी तेलंगाणा राज्यातील आदिलाबाद तर काही शेतकरी यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे कापसाची विक्री करताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या हतबलतेचा फायदा घेत गावागावात काही खासगी व्यापारी कापसाची खरेदी करीत आहेत. साधारणत: ३८०० ते ३९०० रुपयात ही खरेदी केली जात आहे. कापसाचा प्रवास खर्च, मजूर आणि नगदी पैशामुळे शेतकरी गावातच कापूस विक्री करणे पसंत करीत आहे. असे असले तरी या विक्रीतून शेतकऱ्यांनाच प्रति क्विंटलमागे दीड हजारांचे नुकसान सोसावे लागत आहे. कापसाचे उत्पादन सप्टेंबर महिन्यापासून सुरु होते. त्याआधी कापूस खरेदी केंद्र सुरु होणे गरजेचे आहे. परंतु अर्ध्याहून अधिक शेतकऱ्यांकडील कापूस विक्री झाल्यानंतर कापूस केंद्र सुरु होत असल्याचे चित्र दिसते. त्यामुळे पणन महासंघाकडे आता शेतकरी पाठ फिरविताना दिसतात. यावर्षी कापसाची उतारी पाहिजे त्या प्रमाणात नसल्याचे गावागावातील कापूस उत्पादनावरुन दिसून येत आहे. यातच तालुक्यात काही शेतशिवारात व्हायरल रोगाने उभी पिके जागीच वाळून गेली. त्यामुळे नदीपट्यातील शेतकरी चिंतातूर झाला असून शासनानेही यासाठी पाहिजे ती मदत केली नाही. कापसाचे मोठे पिक घेणाऱ्या सोनुर्ली, बोरगाव, भोयगाव, कवठाळा, तळोधी, बाखर्डी आदी शेतशिवारात उत्पादन कमी आहे. कापसाच्या वेचनीचा खर्चही दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे तर काही गावात स्थानिक मजूर मिळत नसून अधिक मजुरीच्या लालसेपोटी मजुरांचे स्थानांतरण बाहेरगावी मोठ्या प्रमाणात होत आहे.त्यामुळे कापूस बऱ्याच शेतात वेचणीच्या प्रतीक्षेत पडून आहे. शासनाने हमीभावात वाढ करून शासकीय कापूस खरेदी केंद्र त्वरित नियोजित गावात सुरु केल्यास शेतकऱ्यांचा वेळ, अंतर व आर्थिक खर्च वाचेल. तेव्हा याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)खासगी व्यापाऱ्यांचा कापूस जातोय मध्य प्रदेशातकाही खासगी कापूस खरेदीदार व्यापारी गावागावात जाऊन कापूस खरेदी करीत आहे. सदर कापसाची विक्री राज्याबाहेर मध्येप्रदेशातील सौसेर व पांदूर्णा कापूस संकलन केंद्रावर अधिक भावाने केली जात असल्याचे समजते.सोयाबीनचीही उतारी घसरलीयावर्षी पावसाचा अनियमितपणा व काही बियाण्याच्या फरकामुळे सोयाबीनच्या एकरी उत्पादनात मोठी घसरण दिसत आहे. एकरी सात ते आठ क्विंटलच्यावर उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना तीन ते चार क्विंटलवरच समाधान मानावे लागत आहे. यातच बाजारात ३९०० रु. खरेदीभाव असताना व्यापाऱ्यांकडून ३६०० ते ३७०० रुपयात प्रत्यक्ष खरेदी सुरु आहे.शेतकऱ्यांची लूटकाही व्यापारी शेतकऱ्यांची गरज ओळखून कवडीमोल भावात कापसाची खरेदी करीत आहे. यात शेतकऱ्यांची लूट होताना दितस आहे.यावर आळा घालण्याची गरज आहे. मजुरांसाठी प्रवासाचा अधिक खर्चबऱ्याच गावात वेचणीसाठी मजूर नसल्याने आॅटो, छोटा हत्तीचे भाडे शेतकरी देत आहे. यामध्ये एका दिवशी ५०० ते ७०० रुपयांचा भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. बाहेरगावातील मजूर प्रवासखर्चाशिवाय वेचणीस तयार होत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे.