शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीपूर्वीच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अजित पवार १० मिनिटांतच निघून गेले?
2
देवळाली कॅम्पमध्ये प्रशिक्षण सुरु असताना २ अग्निवीरांचा मृत्यू; तोफेचा बॉम्बगोळा फुटल्यानंतर अपघात
3
चीनने अरुणाचलप्रदेशवर हल्ला करावा; खलिस्तानी दहशतवादी पन्नूने भारताविरोधात गरळ ओकली
4
पुण्यात पुन्हा हिट-अँड-रन; आलिशान कारच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू
5
निवडणुकीपूर्वी शरद पवारांना धक्का; अमरावतील २८ पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे
6
New Rule : तुमच्या डीमॅट खात्याशी निगडित नियम बदलणार, SEBI ची घोषणा; ‘या’ तारखेपासून बदल होणार
7
सूरजसाठी थेट सिनेमा कसा जाहीर केला? केदार शिंदे स्पष्टच म्हणाले- "स्क्रिप्ट आधीच रेडी होती पण..."
8
बलुचिस्तानातील कोळसा खाणींवर ग्रेनेड, रॉकेट हल्ले; 20 जणांचा मृत्यू
9
पंतप्रधान मोदींनी अर्पण केलेला सोन्या-चांदीचा मुकुट चोरीला गेला; बांगलादेशात खळबळ, जेशोरेश्वरी मंदिरातील घटना
10
Stock Market Update Today : मजबूत जागतिक संकेतांदरम्यान शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; HCL, JSW मध्ये तेजी
11
राज्य सरकार राबवणार ‘घर घर संविधान’ उपक्रम; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
Who is Maya Tata: कोण आहेत माया टाटा? Ratan Tata यांच्या निधनानंतर अचानक का समोर आलं हे नाव?
13
"या वयात लग्न करण्याची काय गरज? असं म्हणतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरच्या आईने सांगितलं ५७व्या वर्षी दुसरं लग्न करण्याचं कारण
14
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
15
"EVM वर आता आरोप करु नका"; हरयाणा निकालानंतर काँग्रेसने बदलली रणनीती
16
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
17
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
18
जगप्रसिद्ध 'तारा पान' पोरके झाले: छत्रपती संभाजीनगरचा 'तारा' शरफुद्दीन सिद्दिकी यांचे निधन
19
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
20
रतन टाटा... महालातला ऋषी, देशाचा महानायक अन् उद्योजक संत; थक्क करणारे अद्भूत व्यक्तिमत्त्व

गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोककल्याणाचा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवा!

By admin | Published: September 13, 2016 12:43 AM

लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी ब्रिटीश सरकारच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली.

सुधीर मुनगंटीवार : चंद्रपुरातील विविध गणेश मंडळांना दिल्या भेटीचंद्रपूर : लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी ब्रिटीश सरकारच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. सार्वजनिक गणेशोत्सवाने या प्रदीर्घ कालावधीत अनेक स्थित्यंतरे बघितली. स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळविणारच, ही सिंहगर्जना लोकमान्य टिळकांनी केली आणि समाजमन चेतविले. टिळकांच्या या सिंहगर्जनेला शंभर वर्षे यावर्षी पूर्ण झालीत. त्यानिमीत्ताने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून लोकमान्य महोत्सव साजरा करण्याचा संकल्प यावर्षी अर्थसंकल्प मांडताना आपण जाहीर केला आहे. त्यानुसार शासनातर्फे लोकमान्य महोत्सव राज्यभर साजरा करण्यात येत आहे. या गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजसेवेचा, लोककल्याणाचा संदेश आपण सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवावा, असे आवाहन वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.रविवारी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरातील चंद्रपूरचे वैभव गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. पाणी बचाव या संकल्पनेवर आधारित शाळेचे मॉडेल, चंद्रपूरातील जुन्या तसेच नविन छायाचित्रांची प्रदर्शनी, वनऔषधी प्रदर्शन, बांबु प्रदर्शनाचे उद्घाटन तसेच स्वराज्य से सुराज्य तक या विषयावरील चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. रविंद्र भागवत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, डॉ. गोपाल मुंदडा, डॉ. किशोर धांडे, डॉ. मंगेश गुलवाडे, काबरा, डॉ. सुशील मुंदडा, धाबेकर, मधुसुदन रूंगठा, प्रकाश धारणे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. त्यानंतर गिरनार चौकातील जय बजरंग गणेश मंडळ, जटपुरा येथील प्रसिध्द चंद्रपूरचा राजा गणेश मंडळ, अथर्व गणेश मंडळ, भानापेठ वॉर्डातील माता रेणुका गणेश मंडळ, बंगाली कॅम्प येथील गणेश मंडळ, गंज वॉर्डातील न्यु इंडिया गणेश मंडळ या मंडळांना ना. मुनगंटीवार यांनी भेटी दिल्या. यावेळी दीपक बेले, राहूल पावडे, सुभाष कासनगोटटूवार, चंदू पाठक, मनोज पाल, रमेश तिवारी, संदीप आवारी आदींची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)