आॅनलाईन लोकमतमूल : नगराध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धेतील उद्घाटनीय कार्यक्रम सुरू असताना प्रेक्षकांसाठी तयार करण्यात आलेली गॅलरी कोसळली. यात ४० विद्यार्थी जखमी झाले. विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.मूल नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष चषक कबड्डी सामन्याचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. कबड्डी सामने सुरू होण्यापूर्वी उद्घाटनीय कार्यक्रम सुरू करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, मूल नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे व पालिकेतील सर्व नगरसेवक उपस्थित होते. कार्यक्रमानंतर कबड्डी सामने सुरू होणार असल्याने ते बघण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. विद्यार्थ्यांना सामने पाहण्यासाठी लोखंडी रॉड लावून एक तात्पुरती प्रेषक गॅलरी तयार करण्यात आली होती. मात्र उदघाटनीय कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच ही गॅलरी कोसळली. त्यामुळे गॅलरीत उभे असलेले विद्यार्थी खाली कोसळले. यात ४० विद्यार्थी जखमी झाले. यात तीन-चार पुरुषांचाही समावेश आहे. तेथे उपस्थित लोकांनी जखमी विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर यातील १२ विद्यार्थी गंभीर जखमी असल्याने त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, दवाखान्यात आलेल्या काही पालकांनीही आपापल्या पाल्यांना उपचारासाठी चंद्रपूरला हलविले.हे आहेत जखमीभास्कर गणवीर (४४), हर्षवर्धन आंबटकर (१३), साई राजूलवार (१५), गौरव पिल्लमवार (१३), राघव मूलकलवार (१३), मोहन फाले (१४), पियूष मडावी (१२), मनीष वाडगुरे (१०), सार्थक गावतुरे (१४), ओजस बोधे (१४), शुभांगी भोयर (२८), उज्ज्वल पाल (१०) या जखमींना चंद्रपूरला हलविले.
प्रेषक गॅलरी कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:44 PM
नगराध्यक्ष चषक कबड्डी स्पर्धेतील उद्घाटनीय कार्यक्रम सुरू असताना प्रेक्षकांसाठी तयार करण्यात आलेली गॅलरी कोसळली.
ठळक मुद्देनगराध्यक्ष चषक स्पर्धा : ४० विद्यार्थी जखमी