चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोना संकटाने प्रत्येकांच्या नाकात दम आणला आहे. या संकटातून वाचण्यासाठी लसीकरणाचा एकमेव पर्याय सध्या आहे. त्यामुळे प्रत्येक जण लसीकरण करून घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सध्यस्थितीत केवळ ४५ च्या वरील वयोगटासाठीच लसीकरण सुरु असल्यामुळे आणि काही घरातील ज्येष्ठांनी लसीकरणाचा पहिला तसेच दुसराही डोस घेतल्यामुळे आता त्यांना कुटुंबातील तरुण सदस्यांची काळजी लागली आहे. आम्ही लस घेतली, तुम्ही कसेही करा, पण लस घ्या, अशी विनंती ते करताना दिसत आहे.
मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी शासनाने लाॅकडाऊन केले आहे. यामुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला असून प्रत्येकांच्याच मनात आता कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. या संकटातून वाचण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. मात्र लसींच्या तुटवड्यामुळे अनेकांना वंचित रहावे लागत आहे. त्यातच आता १८ ते ४४ वयोगटासाठी सुरु केलेले लसीकरणही बंद करण्यात आले. त्यामुळे ज्या घरातील ज्येष्ठांनी लसीकरण केले, त्या घरातील ज्येष्ठांना आता कुटुंबातील तरुणांच्या लसीकरणाची चिंता सतावत आहे. आम्ही घरीच राहणार आहो, तुम्ही बाहेर जाता, त्यामुळे तुम्हालाही लसीकरण आवश्यक आहे. कसेही करा पण लसीकरणासाठी नंबर लावा, अशी विनंती ते करताना दिसत आहे. मात्र लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणीच बंद असल्यामुळे त्यांचाही नाईलाज होताना दिसत आहे.
बाॅक्स
लसीकरण बंद
१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना देण्यात येणारे लसिकरण काही दिवसांसाठी शासनाने बंद केले आहे. त्यामुळे कुटुंबीयांचे एकूणच ज्येष्ठ नागरिकांमध्ये अधिकच चिंता व्यक्त केली जात आहे.
बाॅक्स
अनेकांनी जागल्या रात्र
१८ ते ४४ वयोगटातील तरुणांनी लसीकण नोंदणी रात्र जागून काढल्या आहे. मात्र नाव नोंदणीशिवाय त्यांच्या हाती काहीच पडले नाहीय.१ तारखेपासून या गटातील नागरिकांना लसीकरण करण्यात येणार होते. यासाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. त्यामुळे नाव नोंदणीसाठी अनेकांनी रात्र जागून काढल्या आहे. विशेष म्हणजे, अनेक वेळा संकेतस्थळ हाॅंग होत होते. तरीही तरुणांनी मोठ्या कष्टाने नाव नोंदणी केली आहे. मात्र आता या गटातील लसीकरणच बंद करण्यात आल्याने तरुणांची निराशा झाली आहे.
बाॅक्स
ज्येष्ठांसाठीही तरुणांचाच पुढाकार
ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे बहुतांश ज्येष्ठांना ऑनलाईन नोंदणीच करता येत नाही. त्यामुळे बहुतांश जणांचे ऑनलाईन नोंदणीसाठी तरुणांनी पुढाकार घेऊन नोंदणी करून दिली. काही तरुणांनी तर ज्येष्ठांसाठी पहाटेपासून रांगेत लागून मदतही केली आहे.
बाॅक्स
एकूण बाधित रुग्ण - ९९९९
कोरोनातुन मुक्त झालेले रुग्ण -
लसीकरण घेतलेले ज्येष्ठ नागरिक
पहिला डोस-
लसीकरण घेतलेले ज्येष्ठ नागरिक
दुसरा डोस-
१८ ते ४४ वयोगटातील लसीकरण घेतलेले -
एकूण लोकसंख्या-