शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
3
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
5
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
6
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
7
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
8
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
9
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
10
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
11
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
12
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
13
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
14
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
15
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
16
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
17
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
18
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
19
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
20
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!

प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात विलगीकरण केंद्र सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 4:26 AM

भद्रावती : भद्रावती व वरोरा शहर तथा तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन या ठिकाणी ३० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, ...

भद्रावती : भद्रावती व वरोरा शहर तथा तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन या ठिकाणी ३० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, २० छोटे व्हेंटिलेटर (एनआयव्ही), एक ॲम्ब्युलन्स, एक स्वर्गरथ, जैन मंदिर कोविड केंद्रात ३० बेड्स तसेच प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांनी भद्रावती येथील आढावा बैठकीत दिली.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या आढावा बैठकीचे आयोजन बुधवारी नगर परिषद भद्रावती सभागृहात करण्यात आले होते.

ग्रामीण भागातील वाढत्या रुग्णांचा विचार करता दोन्ही तालुक्यांतील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात एक विलगीकरण केंद्र सुरू करण्यात येणार असून, यामध्ये प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात १५ बेडचे नियोजन करण्यात येणार आहे. विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांची अँटिजन चाचणी करण्याबाबतही त्यांनी सांगितले. जैन मंदिर कोविड सेंटर येथे रुग्णांना भेटायला येणाऱ्या नातेवाइकांवरही पोलिसांनी वचक ठेवावा, अशी माहिती देण्यात आली. या वेळी धानोरकर यांनी या सर्व कामांसाठी एक कोटीचा निधी नगरपालिकेला दिला आहे.

या वेळी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपविभागीय अधिकारी वरोरा सुभाष शिंदे, तहसीलदार महेश शितोळे, ठाणेदार सुनील सिंह पवार, संवर्ग विकास अधिकारी मंगेश आरेवार, नगर परिषद मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीष सिंग, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय असुटकर आदी उपस्थित होते.