सास्ती : ग्रामस्थांच्या सहकार्यातून व तलाठ्यांच्या पुढाकाराने राजुरा तालुक्यातील वरूर रोड येथे २० बेडचा विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण जनतेला मोठा आधार मिळणार आहे.
सध्या कोरोना रुग्णांवर उपचार करणे किंवा विलगीकरण कक्षात बेड उपलब्ध होत नसल्याने जीविताला धोका निर्माण होत आहे. ही समस्या लक्षात घेत, वरूर रोड येथील तलाठी विनोद गेडाम यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यातून विलगीकरण कक्ष सुरू करण्याबाबत चर्चा केली आणि ग्रामस्थांनी यासाठी तयारी दर्शवली. तलाठी विनोद गेडाम यांच्या पुढाकारातून आणि ग्रामस्थांच्या मदतीने २० बेडच्या विलगीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. यात शासनाच्या मदतीशिवाय रुग्णांची नाश्ता आणि जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
या विलगीकरण कक्षाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य रामदास पुसाम, सरपंच संगीता कोडापे, उपसरपंच रमेश काळे, तलाठी विनोद गेडाम, ग्रामसेवक मरापे, पोलीसपाटील बंडू भोंगळे, ग्रामपंचायत सदस्य आबाजी धानोरकर, राजू धानोरकर, सोलार कंपनीचे वसंतराव वरारकर, आशा सेविका रंजना नगराळे, आरोग्यसेविका मरापे, गेडाम, ठाकूर, आदी मान्यवर उपस्थित होते.