सुधीर मुनगंटीवार : सामान्य रुग्णालयात सिटी स्कॅन मशीन उपलब्धचंद्रपूर : सामान्य रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक सामान्य रुग्णाची सेवा म्हणजे ईश्वराची सेवा आहे, असे समजून रूग्णालयातील प्रत्येकाने काम केले पाहिजे, असे सूचनावजा मत राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथील प्रसुती पश्चात कक्ष तथा सिटीस्कॅन मशिनच्या लोकार्पण सोहळयाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर तर प्रमुख पाहुणे म्हणून वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आमदार नाना शामकुळे, महापौर राखी कंचर्लावार, नागपूर येथील आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ.संजय जायसवाल, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पी.एम. मुरंबीरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्रीराम गोगुलवार उपस्थित होते.जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दोन कोटी २० लाख रुपये खर्च करुन सिटीस्कॅन मशिन खरेदी करण्यात आली आहे.या मशिनचा चंद्रपूर जिल्हयातील व चंद्रपूरच्या बाजूच्या जिल्हयातील नागरिकांनासुध्दा लाभ होणार आहे. तसेच ७२ लाख ५१ हजार रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या प्रसुती पश्चात कक्षामुळे प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांना सुविधा मिळणार असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात सर्व सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन दिला जाईल. त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. सामान्य रुग्णालयात सामान्य माणूस येत असल्यामुळे त्याला आपण सर्वांनी आपुलकीच्या भावनेने सेवा देण्याचे काम करावे, असेही ते म्हणाले.यावेळी आमदार नाना शामकुळे यांनी सुध्दा यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पी.एम.मुरंबीकर तर आभार डॉ.सोनारकर यांनी मानले. या कार्यक्रमास डॉक्टर, चंद्रपूर महापालिकेचे नगर सेवक व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)सीटीस्कॅनचा रूग्णांना लाभ होईल - हंसराज अहीरचंद्रपूर येथे बसविण्यात आलेल्या सीटीस्कॅन मशीनचा सामान्य गरीब रूग्णांना लाभ होईल, असे यावेळी बोलताना ना. हंसराज अहीर म्हणाले. चंद्रपूरसह गडचिरोली व यवतमाळ जिल्ह्यातील रूग्ण मशिनचा लाभ घेऊ शकतील. सदर मशिन अत्याधुनिक असून मशिनच्या तपासण्या महागड्या आहेत. या खर्चिक तपासण्या आता स्वस्तात होतील, असेही ते म्हणाले.
सामान्य रुग्णांची सेवा हीच ईश्वरसेवा
By admin | Published: February 25, 2017 12:33 AM